येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले या महामानवास जयंतीनिमित्त अभिवादन सभा संपन्न.
येवला प्रतिनीधी--सलिम काझी.
येवला येथील सम्राट फाऊंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आभिवादन सभेचे अध्यक्ष राहुल सोनवणे हे होते.प्रसंगी येवला येथील विविध बहुजन संघटना तसेच संस्थेचे संस्थापक ,अध्यक्ष ,पदाधिकारी,कार्यकर्ते यांचा समावेश होता.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनोदजी त्रीभुवन यांनी केले.संभाजी ब्रीगेडचे तालुका अध्यक्ष सुदामभाऊ पडवळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले महात्मा फुले यांचे लेखन व बहुजनांच्या मुलांच्या व स्त्रीशिक्षणासाठी केलेल्या संघर्षाचा ईतिहास समजावून सांगितला .सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ऊबाळे यांनी महात्मा फुले यांचे साहित्य वाचनास प्रवृत्त करीत ईतिहासाला ऊजाळ दिला.M.G.S.ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिल लोंढे व लहुशस्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष करन अव्हाड यांनी सर्व कार्यकर्त्यांना फुले दांम्पत्यांचे महान कार्य समजावून सांगत चळवळी विषयी मार्गदर्शन केले .तसेच भिमआर्मीचे तालुका अध्यक्ष विजय पगारे यांनी फुल्यांच्या विज्ञानवादि विचार जोपासण्याचा संदेश दिला प्रसंगी भा.रि.प.युवा.तालुका अध्यक्ष विलासजी देहडे.अमोल सोनवणे ,सागर पडवळ आदि.कार्यकर्ते उपस्थित होते.प्रत्येकाला समाजकार्याची ओढ निर्माण व्हावि यासाठी सम्राट फाऊंडेशन सदैव तत्पर असेन अशी ग्वाही देत अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी कार्यक्रमाची सांगता झाली आसे घोशित केले .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें