रोटरी क्लब सोनपेठ येथे डिस्ट्रीक गव्हर्नर व्हिजीट संपन्न. ग्रंथदान व वॉटर फिल्टरचेही केले वाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 28 अप्रैल 2018

रोटरी क्लब सोनपेठ येथे डिस्ट्रीक गव्हर्नर व्हिजीट संपन्न. ग्रंथदान व वॉटर फिल्टरचेही केले वाटप.

रोटरी क्लब सोनपेठ येथे डिस्ट्रीक गव्हर्नर व्हिजीट संपन्न.

ग्रंथदान व वॉटर फिल्टरचेही केले वाटप.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२८एप्रिल २०१८
सोनपेठ शहरातील मारवाडी बालाजी मंदिर येथे दि.२७ एप्रिल शक्रवार रोजी दुपारी ठीक ३ वाजता रोटरी क्लब डिस्ट्रीक गव्हर्नर व्हिजीट संपन्न झाली. या छोटेखाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष रो.बालमुकुंद सारडा, तर रो.व्यंकटेश चन्ना (डी.जी.३१३२) प्रांतपाल, रो.सुर्यकांत महाजन ( उप प्रांतपाल), रो.इंजी.चंद्रकांत लोमटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांचा यथोचित सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आर्य वैश्य समाजभूषण रो.नागनाथ सातभाई यांना सेवा पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. तसेच संदीप आंबेकर यांनाही रोटरी क्लब सोनपेठच्या पिण्याच्या पाणी टाकी उभारणीस सहकार्य केल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. पत्रकार किरण स्वामी यांची नुकतीच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे; या उपलब्धी बद्दल किरन स्वामी यांचाबी याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब सोनपेठच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते दहिखेड जि.प.प्राथमिक शाळेस वॉटर फिल्टरचे वितरण करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब च्या माध्यमातून अलिबाबा ग्रुप मिशन मिलियन ग्रुप च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयास १२० ग्रंथ भेट देन्यात आले. ही ग्रंथभेट संस्था अध्यक्ष रो.परमेश्वर कदम, ग्रंथपाल अनंता सरकाळे, रो.प्रा.वसंत सातपुते, प्रा.मारोती कच्छवे, रो.प्रा.विठ्ठल जायभाये आदींनी स्वीकारली. तसेच रोटरी क्लब सोनपेठ अध्यक्ष रो.बालमुकुंद सारडा यांनी डी.जी.३१३२ साठी रो.व्यंकटेश चन्ना यांना५० डाॕलर चा धनादेश सुपुर्द केला.
यावेळी रो.बालमुकुंद सारडा यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी रो.व्यंकटेश चन्ना यांनी रोटरी क्लबचे आंतरराष्ट्रीय कार्य, त्याची व्याप्ती व आपले समाजासाठी चे उत्तरदायित्व या विषयी मार्गदर्शन केले. याप्रंगी बोलतांना ते पुढे म्हणाले की, आपण समाजाचे काही देणे लागतो या उद्दात हेतूने जास्तीत जास्त लोकांना हा एक मंच कार्य करतो करत राहणार आहे. बारा जिल्ह्यातून तसेच रो.सुर्यकांत महाजन उप प्रांतपाल यांच्या कडे असलेल्या चार जिल्ह्यात सोनपेठ रोटरी क्लब च्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.विठ्ठल जायभाये यांनी तर आभारप्रदर्शन रो.इंजी.चंद्रकांत लोमटे यांनी केले. यावेळी सुभाषअप्पा नित्रुडकर, राजेश चांडक, रो.किरण चौलवार, रो.घनशामदास झंवर, रो.संजय आढे, रो.प्रमोद गावरस्कर, रो.संजय इंदुरकर, रो.गजानन घोडे, रो.संजय काबरा, रो.संतोष निर्मळे, रो.अनिल शेटे आदींची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचीन देशपांडे व महादू चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें