उंबरखेडा तांडा येथे जगदंबा माता व सेवालाल महाराज यात्रा उत्साहात संपन्न। - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 27 अप्रैल 2018

उंबरखेडा तांडा येथे जगदंबा माता व सेवालाल महाराज यात्रा उत्साहात संपन्न।

उंबरखेडा तांडा येथे जगदंबा माता व सेवालाल महाराज यात्रा उत्साहात संपन्न।


कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।

कन्नड तालुक्यातील उंबरखेडा तांडा येथे सालाबाद प्रमाणे या वर्षी ही जगदंबा माता व सेवालाल महाराज यात्रा उत्साहात संपन्न झाली यात्रेच्या पहील्या दिवशी सेवालाल महाराज यांची भव्य दिव्य पालकी मिरवणुक गांवा मधुन काढण्यात आली होती मिरवणुकी मध्ये लहान मुलांसह युवक जेष्ठ नागरीकांची उपस्थिती होती।

सायंकाळी 10:30 वाजता श्री बंडुनाना धुळेकर सह सुनिताबाई धुळेकर यांचा आदर्श लोकनाट्य तमाशा मंडळ आयोजित करण्यात आला होता पंचोक्रोशातील रसिक बांधवांसह जिल्ह्याच्या कान्या कोपर्यातुन तमाशा प्रेमी तमाशा बघण्यासाठी आले होते आदर्श लोकनाट्य तमाशा मध्ये प्रथम गन गवळन रंगमंच व वद संपन्न झाला कलाकारांनी रसिक बांधवांच मन जिंकुन घेतलं होतं। 

यात्रेच्या दुसरे दिवशी भव्य कुस्तीचा आखाडा रमला होता या मध्ये प्रथमच परीसरा मध्ये महीला पहीलवानांनी सहभाग नोंदवीला होता आणि शेवटच्या कुस्तीचे बक्षीस वितरण कन्नड सोयगांव विधानसभा मतदार संघाचे श्री मारोती (काका) राठोड यांच्या हस्ते देण्यात आले।

यावेळी उंबरखेडा तांडा चे सरपंच श्री अनिल एम चव्हाण, माजी सरपंच दुलचंद बी चव्हाण,डॉ पंकज जाधव, अंकुश राठोड, सुभाष राठोड, कैलास चव्हाण, झेड बी चव्हाण सर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश राठोड, उपाध्यक्ष अविनाश निकम, पै बळीराम पवार, मिस्तरी अजमल पठाण वाल्मिक चव्हाण, आदिंसह गांवकर्यांची उपस्थिती होती।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें