सोयगाव देवी गावाला पाणी पुरवठा करणार्या पाईपलाईनची अज्ञात व्यक्तीकडुन नासधुस.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 9 अप्रैल 2018

सोयगाव देवी गावाला पाणी पुरवठा करणार्या पाईपलाईनची अज्ञात व्यक्तीकडुन नासधुस..

सोयगाव देवी गावाला पाणी पुरवठा करणार्या पाईपलाईनची  अज्ञात व्यक्तीकडुन नासधुस..


  कारवाई करण्यासाठी भोकरदन पोलिस स्टेनला गावकर्यांनी दिले निवेदन...


 २० दिवसापासुन सोयगाव देवी गावाला निर्जळी

  प्रतिनिधी : भोकरदन

  भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी गावातील पाणी पुरवठा करणार्या विहीरीवल पाईपलाईन व वायरिंग अज्ञात व्यक्तीने तोडल्याने गेल्या विस दिवसापासुन गावाला निर्जळी असुन ,९ मार्च रोजी गावातील ८० ते ९० ग्रामस्थांनी भोकरदन पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

   पुढे निवेदनात म्हटले आहे की,मौजे सोयगाव देवी या गावासाठी कुंभारी शिवारातील पुर्णा नदीमध्ये असलेल्या विहीरीतुन पाणी पुरवठा केला जातो,सदरील विहीरीच्या बाजुला कुंभारी ग्रामपंचायतची सार्वजनिक विहीर असुन,या विहीरीवरती ८ मार्च रोजी प्रजापती आडवे बोअरचे काम सुरू होते. सदरील प्रजापती बोअर वेलने सोयगाव देवी गावाला पाणी पुरवठा करणार्या विहीरीमध्ये बोअर घेत असल्याने सोयगावचे सरपंच,ग्रामसेवक,तंटामुक्ती अध्यक्ष यांनी ८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता भोकरदन पोलिस स्टेशनला तक्रार देऊन,पोलिस स्टेशनचे कर्मचारी भोपळे यांनी सदरील ठिकाणी जाऊन आडव्या बोअरचे काम बंद करून संबधीतांना सुचना दिल्या होत्या.
   पण त्याच राञी अज्ञान व्यक्तीने येऊन विहीरी जवळील विद्युत मोटार ,केबल,व पाईपाची नासधुस करून नुकसान केल्याने सोयगाव देवी गावाचा पाणी पुरवठा बंद झाला असुन,सदरील ग्रामपंचायतचे दिड लाखाच्या असपास नुकसान झाले आहे.तरी संबधीत व्यक्तीचा शोध घेऊन घेऊन त्यावर कठोर कारवाई करावी.अशी मागणी गावकर्यांनी यावेळी पोलिस निरिक्षक दशरत चौधरी यांच्याकडे केली,या निवेदनावर सरपंच संगिताबाई राऊत,सदस्य श्रीमंत राऊत,रविंद्र तायडे,रामेश्वर पडोळ,गुलाबराव सहाने,आमोल सहाने,तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम राऊत,ज्ञानेश्वर सहाने,गजानन सहाने ,सुशिल थिटे सह गावातील ८० ते ९० ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

   कोट : - सोयगाव देवी गावाला ५ किमी अंतरावरून कुंभारी शिवारातील पुर्णा नदी पाञाच्या विहीरीतुन पाणी पुरवठा केला जातो,या विहीरीवर नेहमीच कोणी अज्ञात व्यक्ती केबल चोरणे,वायरूप तोडणे,पाईप तोडणे,वायरिंग तोडणे असे कृत्त करत असल्याने गावाचा नेहमी पाणी पुरवठा खंडीत होत असल्याने यासंबधी अनेकदा तक्रारी दिल्या असुन,अजुनही कुठलीही कारवाई झालेली नाही.तरी या अज्ञात व्यक्तीचा तत्काळ शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करावी..

  श्रीमंत राऊत : ग्रामपंचायत सदस्य सोयगाव देवी            कोट :- गावात गेल्या २० दिवसापासुन पाणी येत नसल्याने हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी १ ते दिड किमी अंतर पायी जावे लागत आहे.गावाच्या असपास पाणी नसल्याने पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असुन,ग्रामपंचायतने टॅंकर व्यवस्था करावी नसता महिलांच्या वतीने तहसिलवर हंडा मोर्चा काढण्यात येईल...

  राधा शरद वाघ : ग्रामस्थ महिला.

  कोट :-  पोलिस कर्मचार्यांना कुंभारी शिवारातील सदरील विहिरीवर पंचणामा करण्यासाठी पाठवले असुन,पंचनामा झाल्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात येईल ..

  दशरत चौधरी : पोलिस निरिक्षक भोकरदन

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें