तीन तलाक विधयेक विरोधातील मुस्लीम महिलांचे धरणे आंदोलन यशस्वी.
*हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती.
समशेर खान.
सेलू/प्रतिनीधी
मुस्लमीम समाजाच्या शरीयत (वैयक्तीक कायदा) मध्ये केंद्रशासन हस्तक्षेप करून मुस्लीम समाजात प्रचलित असलेली तलाक पद्धतीला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करत असून त्या अनुषंगाने केंद्रशासनाने तीन तलाक विरोधी विधयेक लोकसभेत पारीत केला आहे. सदरील कायदा मुस्लीम समाजाच्या धार्मिक जीवनामध्ये हस्तक्षेप करणार असल्याने मुस्लीम समाजाच्या महीला संतप्त झाल्या आहेत. याच अनुषंगाने शहरातील मुस्लीम महिलांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन सादर केले.
मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या आवाहनानुसार संपुर्ण देशात कधीही घराबाहेर न पडणाऱ्या मुस्लीम महिला संतत्प होऊन या जाचक विधयेकाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.
ह्यांचा एक भाग म्हणून सेलू शहरामध्ये मुस्लिम महिलांनी दिनांक 9 एप्रिल, सोमवार रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. या प्रसंगी अनेक महिला वक्त्यांनी आपले मनोगत मांडत असताना आमच्या शरीयत कायद्यामध्ये शासनाने हस्तक्षेप करू नये तसेच आमचा शरीयत कायदा आमच्या सुरक्षेसाठी असून आम्ही आमच्या शरीयत कायद्यानुसारच जीवन जगु व जाचक विधयेकचा निषेध करत असून आमचा यास नेहमीच विरोध राहील.
धरणे आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी समाजातील सर्वच घटकांनी परीश्रम केले. यावेळी महिला पोलिस कर्मचारी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या चोख बंदोबस्त होता.

यामध्ये हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या. उपजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महामहिम राष्ट्रपती महोदयांना सादर केलेल्या निवेदनावर तहसीन गोहर, नगरसेविका शेख अख्तर बेगम, वहीदा बेगम, आरेफा तबस्सुम बेग, पठाण तसनीम, शेख तसनीम बेगम, सुमेरा घौरी, नजमा बेगम, शेख इरफाना पटेल, शगुफ्ता तरन्नुम, अखिला बेगम बेलदार, मिनहाज बेगम, नगरसेविका नाहेदा बेगम, आयेशा सिद्दिकी, सिद्दिका सालेहा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
धरणे आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी समाजातील सर्वच घटकांनी परीश्रम केले. यावेळी महिला पोलिस कर्मचारी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या चोख बंदोबस्त होता.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें