उपोषणापूर्वी काँग्रेस नेत्यांचा पितळ उघडे छोले-भटुरेवर ताव. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 9 अप्रैल 2018

उपोषणापूर्वी काँग्रेस नेत्यांचा पितळ उघडे छोले-भटुरेवर ताव.

उपोषणापूर्वी काँग्रेस नेत्यांचा पितळ उघडे छोले-भटुरेवर ताव.

देशातील दलितांवरील वाढत्या अन्यायाविरोधात दिल्लीतील राजघाटवर काँग्रेस कडून एक दिवसीय उपोषण सुरू आहे. या उपोषणाचे नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करत आहेत. याच दरम्यान, काँग्रेसचे काही नेते छोले-भटुरेवर ताव मारतानाचे छायाचित्र समोर आल्याने काँग्रेसवर टीका होताना दिसत आहे. सोशल मीडियावर हे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. दरम्यान, या छायाचित्रात छोल भटुरेवर आडवा हात मारणारे काँग्रेस नेते अरविंद सिंग लवली यांनी हे छायाचित्र सकाळी आठ पूर्वीचे असल्याचे सांगत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण काँग्रेसचे नेते उपोषणाच्या नावावर मुर्खात काढत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते मदनलाल खुराणा यांचे सुपूत्र हरिश खुराणा यांनी केला आहे.
हरिश खुराणा यांनी एक छायाचित्र ट्विट करत काँग्रेसला लक्ष्य केले. तिकडे काँग्रेसचे नेते लोकांना राजघाटवर उपोषणासाठी बोलवत आहेत आणि स्वत: एक हॉटेलमध्ये छोले-भटुरे खाण्याची मजा घेतआहेत. चांगल्या पद्धतीने मुर्ख बनवत आहेत, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
खुराणा यांनी ट्विट केलेल्या फोटोत दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन, हारून युसूफ आणि भाजपातून काँग्रेसमध्ये सहभागी झालेले अरविंदरसिंग लवली छोले-भटुरे खाताना दिसत आहेत. एका वृत्त वाहिनीशी बोलताना खुराणा यांनी काँग्रेस नेते ज्या हॉटेलमध्ये छोले-भटुरे खात होते, त्याच्या सीसीटीव्हीची तपासणी करायला हवी, अशी मागणी केली.तर दुसरीकडे अरविंदरसिंग यांच्या मते ते सकाळी नाश्ता करत होते. खऱ्या मुद्यावरून लोकांचे लक्ष भटकवण्यासाठी भाजपा असले मुद्दे पुढे करत असल्याचा आरोप केला. हे उपोषण सांकेतिक होते आणि त्याची वेळ सोडेदहा नंतर होती. त्यामुळे आम्ही सकाळी नाश्ता करत होतो. त्याचं इतरांशी देणेघेणे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें