बलात्काऱ्यांना फाशी द्या - मनसेची मागणी.
(मनसे महिला सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन,पंतप्रधानां पाठवल्या बांगड्या)
यवतमाळ :आपल्या देशात होणाऱ्या अल्पवयीन मुलींवरील बलात्कार व त्यांच्या हत्येच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. यातच नुकतीच घडलेली उन्नाव येथील *आसीफाची* घटना, यात ८ वर्षाच्या निरागस मुलींवर ३ नराधमांने केलेल्या सामूहिक बलात्कार व तिची अमानुष हत्या ही घटना माणुसकीला काळिमा फासल्याची आहे. या अत्यांत वाईट घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत असताना याच नराधमांना पाठीशी घालण्यासाठी सत्ताधारी भाजपचे आमदार समोर येत आहे, आणि पंतप्रधान मात्र मूगगिळून गप्प आहेत, याच कारणाने आज मनसे महिला सेनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांगड्या पाठवून त्यांचा निषेध करण्यात आला. एकीकडे सर्व देश याघटनेचा विरोध दर्शवित असताना दुसरीकडे मात्र हेच याच शासनातील काही आमदार त्याना पाठीशी घालत आहे, यामुळे या नराधमांना कुठल्याही कायद्याची भीती उरली नाही.देशात शिरयत सारखा कायदा करून या नराधमांना चांगली अद्दल घडविली पाहिजे जेणे करून असे कृत्य पुन्हा करण्यास कोणाची हिम्मत होणार नाही. सध्यस्थीत झालेल्या उन्नाव आणि मेरठ येथे घडलेल्या घटनांमधील आरोपींना अटक करून त्यांना फाशी देण्याची मागणी मनसे महिला सेनेच्या वतीने आज यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना केली.
या प्रसंगी महिला पदाधिकारी व कार्यकरत्या उपस्तित होत्या ....

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें