बौद्ध - भिम गितांचा बहारदार नजराणा कार्यक्रमास उसळली अलोट गर्दी ;
शेख कलीमसिल्लोड (प्रतिनिधी)दि 18
सिल्लोड येथे बौद्ध - भिम गितांचा बहारदार नजराणा या तिन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन मंगळवार (दि 17)रोजी आयोजित " क्रांतिकारी जल्लोष "या कार्यक्रमास अलोट गर्दी उसळली होती .
विश्ववंदनीय,महामानव भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्त आयोजित बौद्ध - भिम गितांचा बहारदार नजराणा कार्यक्रमाचे आयोजन सिल्लोड तालुका डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
मंगळवार (दि 17)रोजी भिम शाहिर अशोक निकाळजे यांचा बौद्ध - फुले - आंबेडकर - चळवळीचा प्रबोधनकारी संगीतमय भिमगितांचा " क्रांतिकारी जल्लोष "या बौद्ध - भिम गितांचा बहारदार नजराणा कार्यक्रम सिल्लोड शहरातील डाँ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ डाँ. आंबेडकर नगर येथे संपन्न झाला.
" क्रांतिकारी जल्लोष " या बौद्ध - भिम गितांचा बहारदार नजराणा कार्यक्रमाचे उदघाटन माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समीती उपसभापती नंदकिशोर सहारे,माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ , संजय आरके,राजेश्वर आरके, सलिम हुसैन,दशरथ सुरडकर,राजरत्न निकम,अमित आरके,जितू आरके,मनोहर आरके,रवि आरके,आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें