अत्याचार प्रकरणी शुक्रवारी पालम येथे सर्व धर्मियांचा भव्य मोर्चाचे आयोजन.
पालम (अनीस खुरेशी)
जम्मू काश्मिर राज्यातील कठुआ येथील आठ वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार करून कुरपणे तिची हत्या करण्यात आली.तसेच उन्नाव उत्तर प्रदेश व गुजरात येथील युवतीवर बलात्कार करून त्यांचे जिवन उध्वस्त केले.या तिन्ही घटनेचा तीव्र निषेध नोंदवुन संबधितावर जलदगतीने कठोर कार्यवाही करण्यात यावी व बलात्कारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्या यावा आदी विविध मागण्यांसाठी दि.20 एप्रिल शुक्रवार रोजी पालम शहरातील सर्व धार्मियांतर्फे महा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.20 एप्रिल शुक्रवारी सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशन,पोस्ट ऑफिस,हजरत टिपु सुलतान रह.चौक येथुन मोर्चाची सुरूवात होऊन तहसील कार्यालयासमोरील मैदानावर पोहचुन तेथे जाहिर सभेत रूपांतर होउन प्रमुख वक्ताचे मनोगत व्यक्त करण्यात येईल तरी पालम शहरातील सर्व धार्मिय समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें