चेन्नई सुपरकिंग्जचा कोलकाता नाइट रायडर्सवर शानदार विजय. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 11 अप्रैल 2018

चेन्नई सुपरकिंग्जचा कोलकाता नाइट रायडर्सवर शानदार विजय.

चेन्नई सुपरकिंग्जचा कोलकाता नाइट रायडर्सवर शानदार विजय.
url

अटीतटीच्या झालेल्या लढतीत अखेर चेन्नई सुपरकिंग्जनं कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला. कोलकातानं दिलेल्या 203 धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपरकिंग्जनं 205 धावा केल्या. चेन्नईकडून वॉटसन आणि रायडूनं 75 धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात करून दिली असली तरी चेन्नई सुपरकिंग्जच्या विजयावर जाडेजानं शिक्कामोर्तब केले. बिलिंग्ज बाद झाल्यानंतर चेन्नईच्या विजयाच्या आशा काहीश्या मावळल्या होत्या. परंतु ऐन वेळी मैदानावर आलेल्या ब्राव्हो आणि जडेजानं प्रत्येकी एक-एक षटकार लगावत विजय सुनिश्चित केला. तत्पूर्वी आंद्रे रसेलच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आज येथे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 6 बाद 202 धावांचा पाऊस पाडला होता. आयपीएलमध्ये आपल्या सर्वोत्तम खेळीदरम्यान आंद्रे रसेलने 36 चेंडूंतच 11 षटकार आणि एका चौकारांसह नाबाद 88 धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार दिनेश कार्तिक (26) याच्या साथीने सहाव्या गड्यासाठी 7.4 षटकांतच 76 धावांची भागीदारी केली. रॉबिन उथप्पाने देखील 16 चेंडूंत 29 धावांची खेळी केली. रसेल याची सात अथवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना टी 20 मधील ही सर्वोत्तम खेळी ठरली. रसेलने त्यानंतर आक्रमक पवित्रा अवलंबताना शार्दूलला सलग 2 षटकार मारले. ड्वेन ब्राव्होच्या पुढील षटकातही रसेलने दोन, तर कार्तिकने एक षटकार मारला. रसेलने वॉटसनला षटकार ठोकत फक्त 26 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रसेलने 19 व्या षटकात ब्राव्होला सलग तीन षटकार ठोकले. रसेलने अखेरच्या षटकात चहरच्या पहिल्या व अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला 200 धावांचा पल्ला पार करून दिला होता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें