येवला उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण होणार.
येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध.
काझी सलीम ,
जि.नाशिक प्रति निधि
येवला,दि.१९ एप्रिल:-येवला येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सदर इमारतीच्या बांधकामासाठी ६ कोटी १० लक्ष रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण होताच लवकरच या कामाला सुरुवात होणार असून पुढील २४ महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे.
येवला ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालय करण्यासाठी लोक नेते अॅड माणिक रावजि शिदे साहेब ,येवला यांनी वेळो वेळी सदर बाब मा.छगन भुजबळ यांचे निदर्शनात आनुन दिली म्हणुनच मा.छगन भुजबळ साहेब हे सातत्याने पाठपुरावा करत होते. या रुग्णालयाचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयातून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून इमारतीच्या ८ कोटी ५० लक्षच्या बांधकामास राज्य शासनाकडून दि.१४ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर हे बांधकाम सुरु व्हावे यासाठी भुजबळांचा पाठपुरावा सुरूच होता. नुकतीच या इमारतीच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल पडले आहे.
येवला शहर व तालुक्याचा विस्तार बगता शहर व तालुक्यातील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सेवा येवला शहरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे आग्रही होते. सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून येवला शहरात ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची सुंदर इमारत उपलब्ध करून नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर शहर व तालुक्यातील नागरिकांना सर्व वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी साठी येवला ग्रामीण रुग्णालयाला १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास पाठपुरावा केला होता.
येवला शहरात उपजिल्हा रुग्णालय होत असल्याने येवला शहराबरोबरच तालुक्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर येवला उपजिल्हा रुग्णालयामध्ये एकूण ६० नवीन पदे निर्माण होणार आहे. त्यात एक वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया, स्त्री व प्रस्तुती रोग तज्ञ, दोन बधिरीकरण शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी भिसक, बालरोगतज्ञ, एक अस्तीरोग तज्ञ, एक नेत्र शल्यचिकीत्सक, एक दंत चिकित्सक, चार वैद्यकीय अधिकारी अपघात, एक मेट्रन,तीन पीएचएन, याबरोबरच २० अधिपरिचारिका यांच्यसह एक आहार तज्ञ, दोन रक्तपेढी तज्ञ,दोन प्रयोगशाळा शास्त्रज्ञ, एक क्षकिरण विभाग,एक इसीजी तंत्रज्ञ इ. विविध ६० नवीन पदांचा समावेश आहे.
अस्तित्वातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ७० बेडचे वार्ड, अद्ययावत आयसीयु,ऑपरेशन थिएटर, प्रशासकीय विभाग, रक्तपेढी, प्रयोगशाळा तर दुसऱ्या मजल्यावर मेडिकल कॅम्प हॉल, ट्रामा केअर युनिट इ. बाबींचा समावेश असेल. मागील मोकळ्या भूखंडामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची धर्मशाळा, कॅटीन तर रूग्णालयाच्या परिसरात बायोमेडिकल वेस्ट इत्यादींचा समवेश असेल. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नवीन मंजूर ६० पदे भरली जातील तसेच विशेष अद्ययावत उपकरणे व यंत्रसामुग्री पुरविली जाणार आहे. या उपजिल्हा रूग्णालयामुळे या भागातील रुग्णांना येवला येथे विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल.
--

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें