आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते प्रथम कुस्ती लावण्यात आली.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 9 अप्रैल 2018

आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते प्रथम कुस्ती लावण्यात आली..

आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते प्रथम कुस्ती लावण्यात आली..


कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज

कन्नड तालुक्यातील सावरगांव येथे श्री खैसोबा महाराज यात्रा उत्साहत संपन्न झाली.तीन दिवशीय यात्रे मध्ये पहिल्या दिवशी गांवातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली होती लहान मुलांसह जेष्ठ नागरिकांची मिरवणुकी मध्ये उपस्थित होती. दुपारी चार वाजता खैसोबा महाराज मंदिर परीसरात बारागाड्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

 दुसरे दिवशी सायंकाळी नगरदेवळेकर लोकनाट्या तमाशा मंडळ सादर झाला पंचोक्रोशातील तमाशा प्रेमी व रसिक बांधव तमाशा बघण्यासाठी आले होते लोकांच मन जिंकुन घेतलं होतं तामाशानं या मध्ये प्रामुख्याने गण गवळण व रंगमंच संपन्न झाला.

यात्रेच्या तिसरे दिवशी दुपारी दोन वाजता भव्य कुस्तीचा आखाडा रमला होता जिल्हा भरातुन मल्ल कुस्ती खेळण्यासाठी आले होतो प्रमुख पाहुणे म्हणुन कन्नड सोयगांव विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार हर्षवर्धन दादा जाधव यांच्या हस्ते प्रथम कुस्ती लावण्यात आली यावेळी सावरगांव नगरीचे प्रथम नागरिक सरपंच श्री सिध्दु (भैय्या) सुलतान नाजीमोद्दीन शेख  माजी सरपंच रावसाहेब निकम पोपटराव निकम विविध विकास सेवा सोसायटी चेयरमैन सांडु निकम फैय्याज खाँ पठान रमेश माळी राजु गायकवाड  आदींसह गांवकर्यांची उपस्थिति होती.।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें