सेलु येथे लग्नाचे अामिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार.
समशेर खान.
सेलू,दि.२९/ प्रतिनिधी.
शहरातील एका पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावत लग्नाचे अामिष दाखवून अत्याचार केल्या प्रकरणी एका इसमावर सेलू पोलिसात रविवारी (ता.२९) रोजी गुन्हा नोंद करण्यात अाला असून त्या अारोपीला अटक करण्यात अाली अाहे.
पोलिस सुञांनी दिलेल्या माहितीनूसार अारोपी हा अाब्दूल नवीद अ हमिद ( वय २८ ) रा.नाला रोड,सेलू याने एका अल्पवयीन मुलीस फुस लावून दि.२४ एप्रिल रोजी मुंबई येथे पळवून नेले.त्यानंतर मुलिच्या पित्याने सेलू पोलिसात तक्रार दाखल केली होती.(ता.२९) रोजी अारोपी व अल्पवयीन मुलगी स्वत:पोलिस ठाण्यात हजर झाले.अारोपी अाब्दूल नवीद याचे लग्न झाले असून अल्पवयीन मुलिस लग्नाचे अामिष दाखवून बळजबरीने बलात्कार केल्याची तक्रार सेलू पोलिसात दाखल करण्यात अाली अाहे.त्यानंतर पास्को कायद्यानूसार अाब्दूल नवीद याच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात अाला असून त्याला अटक करण्यात अाली अाहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक डाॅ. नितीन काशीकर,पोलिस कर्मचारी रामेश्वर मुंढे हे तपास करित अाहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें