सेलु=सायली स्किल डेव्हलोपमेंट सेंटर येथे महात्मा फुले जयंती साजरी.
समशेर खान.सेलू:- दि.11/4/2018,बुधवार ,रोजी सेलू येथील सायली स्किल डेव्हपलोमेन्ट सेंटर ,सेलू येथे महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या उदघाटक तस्लिम पठाण तर प्रमूख वक्तेश्री. प्रताप देशमुख हे होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र संचालक श्री.गोपाळराव थोरात हे होते.
यावेळी प्रमुख वक्ते प्रताप देशमुख यांनी ''महात्मा फुले यांची कार्य आणि भूमिका"या विषयावर तर उद्घाटक तस्लिम पठाण यांनी "महात्मा फुले यांचे महिलांसाठीचे महत्वपुर्ण योगदान"या विषयावर व्याख्यान केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.गोपाळराव थोरात यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सविता पाईकराव मॅडम यांनी केले.यावेळी बहुसंख्य महिलावर्ग उपस्थित होता.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें