मानवत येथील जिनिंग मालकास मारहान प्रकरण; व्यापारी महासंघाचा पोलीस ठाण्यावर मुक मोर्चा! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 27 अप्रैल 2018

मानवत येथील जिनिंग मालकास मारहान प्रकरण; व्यापारी महासंघाचा पोलीस ठाण्यावर मुक मोर्चा!

मानवत येथील जिनिंग मालकास मारहान प्रकरण; व्यापारी महासंघाचा पोलीस ठाण्यावर मुक मोर्चा!

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२७: मानवत येथील व्यापारी  महासंघ,आडत असोशिएशन,काॅटन जिनींग असोशिएशन यांच्या वतीने भगतराम जिनींग कारखाण्यात जिनींग मालकास झालेल्या मारहान प्रकरणी आज दि.२७ एप्रिल रोजी आपली प्रतिष्ठाने बंद करुन  मुक मोर्चा पोलीस ठाण्यावर काढुन पोलीस निरीक्षक प्रदीप पालीवाल व तहसील कार्यालय येथील अव्वल कारकुन श्रीमती सुर्वणकार यांना या बाबत निवेदन देण्यात आले.
शहरात निघालेल्या मुक मोर्चाची सुरुवात संत सावतामाळी चौकातुन  मुक मोर्चा मेनरोड मार्गाने पोलीस ठाण्यावर धडकला.
शहरातील भगतराम जिनींग कारखाण्यात दि.२३ रोजी कापसाला जास्त भाव  देण्यात येत नसल्यामुळे तेथील मालक व कर्मचार्‍यांना लाथाबुक्कांनी मारहान करण्याची घटना घडली होती.यावेळी गोपाळ तोष्णीवाल यांनी मानवत पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती.त्यानतंर आरोपी ला  अटक करण्यात आली होती .शहरात वारंवार अशा घटना घडु नयेत यासाठी प्रशासनाचे योग्य ती उपाय योजना करण्यात यावे,यासाठी सर्व व्यापारी मध्ये भीतीचे वातावरण असुन व्यापारी भयग्रस्त झालेले आहेत.याघटनेचा निषेध म्हणुन शहरातील व्यापार्‍यांनी दुकाने बंद व मुक मोर्चा काढुन जाहीर निषेध यावेळी   करण्यात आला.
या निवेदनावर व्यापारी महासंघ अध्यक्ष संजय लड्डा,बाळु मोरे,सचीव -कृष्णा बाकळे,व्यापारी आडत असो.अध्यक्ष आश्रोबा कुर्‍हाडे,काॅटन जिनींग अध्यक्ष गिरीश कञुवार ,शैलेश काबरा,दिलीप हिबारे,विजयकुमार दलाल,राजु कच्छवे,नंदुभाउ मंञी,म.ईणुस बागवान आदीची स्वाक्षर्‍या आहेत.या मुक मोर्चात शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें