“ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिंतूर कडून प्रमुख कार्यकर्ता मेळावा संपन्न.
निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा – आ.विजय भांबळे”
पठाण अजमत/ जिंतूर-
आज दि.०९/०४/२०१८ रोजी तुकाई मंगल कार्यालय, जिंतूर येथे आ.विजय भांबळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिंतूर आयोजित प्रमुख कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यास जिंतूर तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आ.विजय भांबळे यांनी सांगितले कि, मी २०१८ या वर्षी जिंतूर सेलू तालुक्यात अनु.जातीच्या नागरिकांना जिल्ह्यातील इतर तालुक्यापेक्षा सर्वात जास्त म्हणजे ४५०० रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर करून दिले आहेत. विरोधकांना याची कल्पना देखील नाही ते काहीही चुकीचे आकडे सांगत आहेत, असे म्हणून त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. यापुढेही प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत देखील आशीच कामगिरी करत एकही गरजू घरकुला पासून वंचित राहणार नाही असे असे आश्वासन दिले. त्याचबरोबर एकूण १० जि.प.सर्कल पैकी चारठाणा, भोगाव, आडगाव, सावंगी म्हा या सर्कल मध्ये डोळ्याच्या शस्त्रक्रियेचे कॅम्प यशस्वीरित्या घेतले असून उद्या १८ एप्रिल रोजी कौसडी येथे कॅम्प घेण्यात येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त गरजूनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच जिंतूर सेलू तालुक्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या वंचित लाभार्थ्यांना लवकरच न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे संगीतले.
येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने कामास सुरवात करावी. भाजप सरकारवर राज्यात ७०% जनता नाराज आहे. भाजप सरकार राज्यात जातीय दंगली घडवत असून त्यांच्या समोर विकासाचा अजेंडा नसल्याने ते हतबल झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व राहणार असून १००% राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा यावेळी आ.विजय भांबळे यांनी केला. राज्यातून तसेच जिंतूर सेलू तालुका भाजप मुक्त करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मोठ्या जोमाने गावपातळीवर कामाला लागून राष्ट्रवादीचा प्रचार व प्रसार करावा असे आवाहन केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष प्रसादराव बुधवंत, तालुका अध्यक्ष मनोज थिटे, जि.प.अध्यक्ष व्ही.पी.राठोड, जि.प.गटनेते अजय चौधरी, जि.प.सदस्य नानासाहेब राऊत, रामराव उबाळे, बाळासाहेब घुगे, विठ्ठल घोगरे, अविनाष काळे, मुरली मते, अभिनय राऊत, प.स.सभापती मधुकर भवाळे, उपसभापती विजय खिस्ते, प.स.सदस्य प्रकाश शेवाळे, दौलतराव दाभाडे, गणेश इलग, शरद मस्के, मुंजाभाऊ तळेकर,दिलीप राव डोईफोडे, प्रल्हादराव ढोणे,बाळासाहेब गायकवाड, बाबाराव ठोंबरे, न.प.अध्यक्ष कपिल फारुकी, न.प.उपाध्यक्ष बाळासाहेब भांबळे, न.प.सदस्य श्यामराव मते, मनोहर डोईफोडे, उस्मान पठाण, प्रदीप चौधरी, शाहेदबेग मिर्झा, दल्मीर पठाण, इस्माईल शेख, आहेमद बागबान, दत्ता काळे, शोएब जानिमिया, फेरोज कुरेशी, त्याचबरोबर अँड. विनोद राठोड, शहर अध्यक्ष शौकत लाला, शंकर गंजे, अक्कू लाला, आशाताई खिल्लारे, सचिन स्वामी, यांच्यासह पक्षातील सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें