शिवरायांनि जनतेचे राज्य निर्माण केले--प्रा.नितिन बानगुडे यांचे प्रतिपादन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 7 अप्रैल 2018

शिवरायांनि जनतेचे राज्य निर्माण केले--प्रा.नितिन बानगुडे यांचे प्रतिपादन.

शिवरायांनि जनतेचे राज्य निर्माण केले--प्रा.नितिन बानगुडे यांचे प्रतिपादन.

आजय बोराडे.
भराडी (प्रतिनिधी
शिवाजी महाराजांचे राज्य स्वतःसाठी निर्माण केलेले राज्य नसुन ते रयतेच राज्य होत,महाराजांनी आयुष्याचा  पन्नास वर्षाचा काळ स्वराज्याच्या अस्मितेसाठी सर्मपित केला हे फार मोठे योगदान आहे. असे प्रतिपादन प्रा.बानुगडे यांनी भराडी येथे ठगन भागवत मित्रमंडळ वतीने आयोजित संभाजी राजे जयंती सप्ताह निमित्ताने केले.

पुढे बोलतानी ते म्हणाले की,महाराजांच्या नावानिशी  आजही खचलेल्या रयतेच्या मनात हुंकार भरतो .
चैतन्याची उर्जा भेटत जाते. एवढा उत्तुंग वाद महाराजांच्या चरीञात सापडतो .शिवरायांनी मुठभर मावळ्यांच्या बळावर जी क्रांति केलि ती जगातील कुठलाही राजा करु शकला नाहीत.स्वराज्य ही अशी एक संकल्पना होती की तेथे लोक जगन्यासाठी नव्हे तर मरण्यासाठी लढत होते,राष्ट्रसेवा जनसेवा करण्यासाठी लढत होते.
यावेळी व्यासपिठावर बोलतांना ह.भ.प आढावणे महाराज यांनी समाजाच्या अभ्युदयासाठी उन्नतीसाठी  तळागाळापर्यंत जावुन शिवराज्याची संकल्पना मुरवावी लागणार असुन आता तलवारी घेऊन युध्द करण्याची गरज नाही उलटपक्षी वैचारीक लढाईसाठी हातात लेखनी घेण्याची गरज आहे असेही ते म्हणाले यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व पुरूषांची उपस्थिती होती.

यावेळी व्यासपिठावर प्रा.नामदेवराव चापे ,खा.रावसाहेब दानवे यांच्या कन्या आशाताई पांडे, ह.भ.प.संतोष महाराज आढावणे, ह.भ.प.भगवान महाराज जंजाळ,विनोद पाटिल,वृषाली सुनील मिरकर,राजेन्द्र महाजन,गजानन महाजन,रमेश साळवे,शिवादादा गौर,विष्णु जांभूळकर,रवि काळे,हरिदास दीवटे,विष्णु जाधव,अर्जुन गवळीकर ,सांडू महाकाळ,प्रवीण काकडे ,डॉ.गजानन काकडे.आदिसह मोठ्या प्रमाणात संत मंहत पदाधिकारी व पंचक्रोशीतील मंडळीची उपस्थिती होती .संचलन राम जंजाळ यानी केले तर प्रास्ताविक ठगन भागवत यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें