महामानवाची जयंती ग्रंथदान करून साजरी.
सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचा उपक्रम.
सोनपेठ (राजेश खेडकर) दि १४एप्रिल २०१८
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७वी जयंती येथील श्री महालिंगेश्वर विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एल.जोशी हे होते तर, तहसीलदार जीवराज डापकर, पोनि सोपान सिरसाट, स्वाराती विद्यापीठ सिनेट सदस्य दत्तत्रय कदम, प्रमोद गावरस्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजन व आदरांजली वाहुन झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे ग्रंथपाल तथा सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर यांनी केले. प्रमुख पाहुने तहसीलदार जीवराज डापकर यांनी यावेळी बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत जीवनात वाचन महत्वाचे असल्याचे सांगीतले.याप्रसंगाचे औचित्यसाधुन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठने केलेल्या डॉ.आंबेडकर अभ्यासन केंद्रासाठी सव्वा लाख ग्रंथ संपादनाच्या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील जानकी अध्यापक विद्यालय सोनपेठ जि. परभणी च्यावतीने संस्था चालक प्रमोद गावरस्कर यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ वाचन चळवळीच्या माध्यमातून एकुण ३११७४ रूपयांच्या ५८६ पुस्तकांचे ग्रंथदान करण्यात आले.
कार्यक्रमास मान्यवरांसह भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रंगनाथ सोळंके, संतोष शहाणे, सोनपेठ तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा पिंगळे, ग्रंथ वाचन चळवळीचे सदस्य सुधीर बिंदु, प्रा.डॉ.संतोष रणखांब, ज्येष्ठ शिक्षक एन.व्ही.स्वामी, व शहरातील ग्रंथप्रेमी नागरीक, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यालयाचे लिपीक तथा ग्रंथ चळवळीचे सदस्य मल्लीकार्जुन सौंदळे यांनी केले तर आभार प्रा.भास्कर तिरमले यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें