वझुर येथील रेशन दुकानदारांसह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 24 मार्च 2018

वझुर येथील रेशन दुकानदारांसह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा.

वझुर येथील रेशन दुकानदारांसह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा.

अन्यथा जिल्हाअधिकारी कार्यालयात  आत्मदहन करण्याचा ईशारा


मानवत / मुस्तखीम बेलदार 
दि.२४: मानवत तालुक्यातील वझुर बु.येथिल रेशन दुकानदार  व मानवत तालुक्यातील तीन हजार बोगस शीधापञिका व धान्य वाटपात झालेला काळाबाजार त्यात दोशी आढळून आलेले आधिकारी व रेशन दुकानदार यांच्यावर गुन्हे दाखल करावे अन्थवा परभणी जिल्हाअधिकारी कार्यालयात केव्हाही अत्मदहन करण्याचा ईशारा वझुर बु. येथिल ज्ञानोबा शहाणे यांनी दि.१४ मार्च रोजी जिल्हाअधिकारी यांना निवेदनात दिले आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की,मानवत तालुक्यातील वझुर बु. येथिल रहिवाशी ज्ञानोबा शहाणे  यांनी रेशन दुकानदार व मानवत तालुक्यातील बोगस तीन हजार  शीधापञिका व धान्य वाटपात झालेला  काळाबाजार उघळकिस आणला होता त्यात दोशी आढळलेले आधिकारी वर  गुन्हे दाखल करणे बाबत दि.२१डिसेंबर २०१६ अमरण उपोषण व दि.१६ डिसेंबर रोजी अत्मदहन यांचे निवेदन मा.आयुक्त साहेब यांना निवेदन देउन ही कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्या मुळे व परभणी जिल्हाअधिकारी कार्यालयात वारंवार निवेदन देउन ही व जिल्हाअधिकारी साहेबांना प्रत्यक्षात भेटूनही ज्ञानोबा शहाणे  यांना न्याय मिळाला नाही तसेच आतापर्यंत दहावेळा चौकशी होऊनही यात रेशन दुकानदार यांच्या सह आधिकारी दोषी आढळले आसुन त्याच्यावर कोनत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही त्या नंतर ज्ञानोबा शहाणे यांनी  २६जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता म्हणुन ज्ञानोबा शहाणे याला परभणी कारागृहात  टाकण्यात आले होते त्यानी जेल मध्ये ८ दिवस अमरण उपोषण करुनही  रेशन दुकानदार व तहसिल मधिल दोषी अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही त्यामुळे दि.१४ मार्च रोजी ज्ञानोबा शहाणे यांनी  परत परभणी जिल्हाअधिकारी यांना निवेदन देउन  वझुर येथिल  रेशन दुकानदार व बोगस शीधापञिका वाटपातील  अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल न झाल्यास जिल्हाअधिकारी कार्यालयात आपन केव्हाही आत्मदहन  करणार असल्याचा  ईशारा दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें