ट्रकने चिरडल्याने वाहतूक पोलीस जागीच ठार.
वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करीत असताना एका ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने ट्रक न थांबवता पोलिसाला चिरडले. यात वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिल शालिग्राम शिसोदे (५२, अमळनेर) असे मयत पोलिसाचे नाव आहे. आज सकाळी महामार्ग पोलीस चौकीसमोरच ही घटना घडली. धडक दिल्यानंतर ट्रक चालक पसार झाला असून ट्रक मात्र पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतला आहे.धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग २११ वर चाळीसगाव नजीक महामार्ग पोलीस चौकीसमोर वाहनांची तपासणी सुरू होती. तपासणी दरम्यान शिसोदे यांनी ट्रक चालकाला थांबण्याचा इशारा केला. तरीही ट्रक चालकाने वाहन न थांबवता ते थेट शिसोदे यांच्या अंगावर घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत शिसोदे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी, आई – वडील व दोन भाऊ असा परीवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून ट्रक चालकांच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें