प्रकाश आंबेडकरांना अटक करा, भिडे समर्थकांची मागणी.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ राज्यभरात बुधवारी सन्मान मोर्चे काढण्यात आले होते. कोरेगाव-भीमा हिंसाचार सहभागाचा ठपका ठेवत संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, संभाजी भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही, असा दावा करत त्यांच्या समर्थकांनी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले होते. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संभाजी भिडेंवर दाखल असलेले गुन्हे खोटे असून, ते मागे घ्यावेत, अशा घोषणा देत धारकरी रस्त्यावर उतरले होते. सांगलीत कडेकोट बंदोबस्तात मोर्चा निघाला तर पुण्यातील मोर्चामध्ये कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत्यू झालेल्या राहुल फंटागळेची आईदेखील सहभागी झाली होती. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें