विद्यार्थ्यांनी द्यानसंपंन्न व्यक्तिंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा - डॉ. विलास पाटील. (बोर्डीकर कृषी महाविद्यालयात डॉ. डख यांचा गौरव ) - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 7 मार्च 2018

विद्यार्थ्यांनी द्यानसंपंन्न व्यक्तिंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा - डॉ. विलास पाटील. (बोर्डीकर कृषी महाविद्यालयात डॉ. डख यांचा गौरव )

विद्यार्थ्यांनी द्यानसंपंन्न व्यक्तिंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा - डॉ. विलास पाटील. (बोर्डीकर कृषी महाविद्यालयात डॉ. डख यांचा गौरव )

समशेर खान.
(सेलू ) जेथे सरस्वती नांदते तेथेच लक्ष्मीचेे वास्तव्य असते, जे विद्यार्थी सरस्वतीची मनोभावे आराधना करतात ते निश्चित यशस्वी होतात त्यामुळे जीवनात यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी द्यानसंपंन्न व चारीञ्यसंपंन्न व्यक्तिंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक व अधिष्ठाता डॉ. विलास पाटील यांनी केले.
येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचे संचालक व माजी प्राचार्य डॉ. आश्रोबा माधवराव डख यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमीत्त संस्थेच्यावतीने मंगळवार दि 6 मार्च रोजी आयोजीत अभिष्टचिंतन व गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. पाटील बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मा. आ. रामप्रसाद बोर्डीकर तर प्रमुख पाहुणे म्हनुण व. ना.म.कृ.वि.चे विस्तार शिक्षण चे डॉ. पी. जी. इंगोले, प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, सभापती बालासाहेब निरस, विजयकुमार शिंदे, बालाजी देसाई, सत्कार मुर्ती डॉ. ए. एम. डख, प्राचार्य डॉ. जोंधळे यांची उपस्थिति होती. याप्रसंगी संस्था व कृषीमहाविद्यालयाच्या वतीने मान्यनरांच्याहस्ते डॉ. डख यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिंन्ह देवुन गौरव करण्यात आला.  या प्रसंगी मा.आ.रामप्रसाद बोर्डीकर यांनी डॉ. डख यांनी़ कृषी महाविद्यालयाच्या उभारणीत दिलेले योगदान बहुमुल्य स्वरूपाचे आहे असे गौरवोदगार काढले .प्रास्तावीक प्राचार्य डॉ. जोंधळे ,सुञसंचलन सुभाष मोहकरे तर डॉ. वसुधा कदम यांनी आभार मानले. प्रा.डॉ.ए.एम.काकडे,प्रा. डाके, प्रा. कादरी, प्रा. मानवतकर,प्रा.मोरे,प्रा.शेळके,प्रा.शिंदे यांनी परीश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें