पतंगराव कदम अनंतात विलिन अंत्यसंस्कारात दिग्गज नेत्यांची उपस्थिती !
प्रतिनिधि.सांगली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांच्यावर आज, सायंकाळी सांगली जिल्ह्यातील वांगी येथे शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या अंत्यसंस्काराला राज्यातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री सदाभाऊ खोत, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश,काँग्रेस नेते अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
दरम्यान पतंगराव कदम यांचं दिर्घकालीन अजारामुळे निधन झालं असून त्यांच्या जाण्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्यासह देशभरातील नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली असून कालच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यांच्या या जाण्यामुळे त्यांच्या जिल्ह्यासह राज्यभरात शोककळा पसरली आहे


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें