कर्जबाजारी शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या, - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 3 मार्च 2018

कर्जबाजारी शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या,

कर्जबाजारी शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या,

*होळीच्या दिवशी मोठी घटना*

*गावात दुःखाचे डोंगर कोसळले*    

*खासगी बँकेचे होते कर्ज*


(भोकरदन प्रतिनिधी)
खासगी बँकेच्या कर्जाला कंटाळून एका ५६वर्षीय वृध्द शेतकऱ्यानी स्वताचे शेतातील असलेल्या अंब्याचे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२.शुक्रवार रोजी तालुक्यातील मौजे क्षीरसागर येथील गट नं २६९येथे सकाळी आठ ते साडे आठ वाजेच्या सुमारास  उघडकीस आल्याने परीसरात एकाच खळबळ उडाली होती आसाराम पांडु कोलते वय ५६वर्षे असे आत्महत्या केलेल्या शेतकरीचे नाव आहे
या विषय सुत्रा कडुन मिळालेली माहिती अशी की आसाराम  यांच्यावर एका खासगी बँकेचे ६०.ते७०.हजार रूपये असल्याचे समजते या विषय मयत शेतकरीचे बंधुने पोलीस ठाण्यात घनटेची माहीती दिली तर पोलीसांनी घटनेची नोंद केली आहे दरम्यान पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार दि.दोन रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास आसाराम हे आपल्या शेतात कुंभारी येथे गेले होते तर ते लवकर आले नसल्यामुळे त्यांचे बंधू यांनी शोध घेतला असता आसाराम पांडु कोलते हे अंब्याचे झाडावर लटकलेले अवस्थेत आढळले येथील शासकीय रुग्णालयात पोस्ट मातम करण्यात आले असुन क्षीरसागर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले ऐन सणासुदीच्या दिवशी घटना घडल्याने गावात दुःखाचे डोंगर कोसळे आहे आसाराम यांच्या पश्चाताप पत्नी.दोन मुले दोन मुली असा परिवार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें