सोनपेठ येथे शहीद दिवसा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
$ तालूका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने होनार ग्रंथदान.
सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२२मार्च २०१८ येथील तालूका वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने दि.२३मार्च २०१८ शुक्रवार रोजी शहीद दिना निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन सदरील कार्यक्रम जिल्हा परिषद प्रशाळा सोनपेठ येथे सकाळी ठीक १०-३०वाजता संपन्न होनार आहे. याच कार्यक्रमात सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीस तालूक्यातील शाळांना भेट देन्यासाठी संघटनेच्यावतीने ग्रंथदान करण्यात येनार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुमित लांडे (मुख्याध्यापक, जि.प.प्रशाळा सोनपेठ) हे असतील तर मानिकराव निलंगे (माजी मुख्याध्यापक श्री महालिंगेश्वर विद्यालय सोनपेठ), अंबादास वाकोडे (खेडकर) (उपाध्यक्ष, परभणी जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना परभणी)व प्रकाश गुंड (सचिव, परभणी जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना परभणी) यांची प्रमुख उपस्थिती लाभनार आहे.
तरी या कार्यक्रमास तालूका पत्रकार संघाचे सर्व सदस्य, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सर्व सदस्य, ग्रंथ वाचन चळवळीचे सर्व सदस्य व नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रामेश्वर विठ्ठलराव पोटे (तालूकाध्यक्ष, तालूका वृत्तपत्र विक्रेता संघटना सोनपेठ) व माधव जगताप (उपाध्यक्ष, तालूका वृत्तपत्र विक्रेता संघटना सोनपेठ) यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें