सर्व पक्षीय नगरसेवकांचे अवैध रित्या पाणीउपसा करणाऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 14 मार्च 2018

सर्व पक्षीय नगरसेवकांचे अवैध रित्या पाणीउपसा करणाऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी

सर्व पक्षीय नगरसेवकांचे अवैध रित्या पाणीउपसा करणाऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी 

  उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली मागणी

शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी:
 भोकरदन शहर व इतर गावातील नागरिकांसाठी पिण्‍याचे पाणी आरक्षीत असलेल्‍या  जुई धरणामधुन अनाधिकृतरित्‍या पाणी उपसा करणा-यावर कायदेशिर कार्यवाही करून अवैध पाणी उपसा बंद करावा या मागणीसाठी भोकरदन येथिल नगर सेवकांनी उपविभागिय अधिकारी यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.
     भोकरदन शहरातील नागरिकांसाठी पिण्‍याचे पाणी आरक्षीत असलेल्‍या जुई धरणतुन अनाधिकृतरित्‍या पाणी उपसा करणा-यावर कायदेशिर कार्यावाही करून अवैध पाणी उपसा त्‍वरीत थांबविण्‍यात यावा जेणेकरून भोकरदन शहरासह इतर गांवाना या धरणातुन उन्‍हाळयामध्‍ये व्‍यवस्थितरित्‍या पाणी पुरवठा होउ शकेल.
भोकरदन शहरासह अठरा गांवाना पाणीपुरवठा करणा-या दानापुर येथील जुई धरणातुन पाण्‍याची चोरी सुरूच आहे. सध्‍या शेतीसाठी मोठया प्रमाणात पाणी उपसा केला जात  आहे. पाणी चोरी अशीच सुरू राहिली तर भविष्‍यात पाणीटंचाईचे संकट उभे राहुन नागरिकांना पिण्‍याचया पाण्‍यासाठी वनवन भटकन्‍याची वेळ येउ शकते . याकडे आपलया स्‍थ्‍रावरून संबधित यंत्रनेला कार्यवाही करण्‍याची गरज आहे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
     मागील तीन वर्षापासुन धरण भरले नव्‍हते, मात्र मागच्‍या जुन जुलै मध्‍ये परतीच्‍या पावसाने जुई धरणात मोठा पाणीसाठा आला..सध्‍या अवैध उपस्‍याने  धरणातील पाणी पातळी कमी होण्‍यास सुरूवात झाली असुन केवळ सहा फुट पाणीसाठा शिल्‍लक आहे.धरणतील बाजुच्‍या विहिरीतुन तसेच धरणातुन शेतीसाठी परिसरातील शेतक-याकडुन मोठया प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे. प्रशासनाने या भागातील रोहित्र बंद करून कार्यवाही करण्‍यात यावी धरणाच्‍या पात्रात सायंकाळी पाच नंतर विद्युत मोटारी सोडुन वारेमाप पाणी उपसा करण-यावर कायदेशिर कायर्वाही करण्‍यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर उपाध्यक्ष इरफानोद्दीन सिद्दीकी   , सुरेश शर्मा ,अब्दुल कदिर,रणविरसिंह जाधव ,नसिम पठाण,अजहरअली शाह ,दिपक बोर्डे , रिजवान शेख ,जफर सेठ,राहुलसिंग ठाकूर,सुरेश तळेकर अदिंच्या साक्षर्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें