मिलिंद एकबोटे यांना अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 14 मार्च 2018

मिलिंद एकबोटे यांना अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

मिलिंद एकबोटे यांना अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई.



 मिलिंद एकबोटे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सुप्रीम कोर्टाने बुधवारी (13 मार्च) सकाळी मिलिंद एकबोटे यांचा जामीन अर्ज फेटाळला. यापूर्वी हायकोर्टानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अहवाल सादर करुन, एकबोटे तपासात सहकार्य करत नसल्याचं म्हटलं होतं. या अहवालावरुन सुप्रीम कोर्टाने एकबोटेंना जामीन देण्यास नकार दिला.पोलिसांनी मिलिंद एकबोटेंविरोधात तीन गुन्हे नोंदवले असून त्यात अॅट्रॉसिटी गुन्ह्याचाही समावेश आहे. पुणे सत्र न्यायालयाने 22 जानेवारीला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. पण उच्च न्यायालयानेही त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास स्पष्ट नकार दिलाहोता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 1 जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आले होते. त्या वेळी तेथे दगडफेक, जाळपोळ झाली होती. ही दंगल घडवून आणल्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें