धुक्यात हरवली पहाट
*प्रकाश झोतात वाहनांची ये-जा
सोनपेठ(राजेश खेडकर) दि.१७ मार्च २०१८हिन्दू नववर्ष आगमनाच्या एक दिवस आगोदरची आजची सकाळ धुके पांघरुन आली. सोनपेठ शहर व परिसरात प्रचंड धुक्याचे साम्राज्य दिसुन आले. कांही पावलाच्या अंतरावरील वस्तूसुद्धा दिसत नव्हती येवढी दृश्यमानता कमी होती. सकाळच्या प्रसन्न वातावरणात फिरण्या साठी घराबाहेर पडलेल्यांनाही यामुळे आपापल्या घरी परतावे लागले. धुक्यामुळे सकाळी तुरळक वाहनं पाहायला मिळत होती. रस्त्यावरुन ये-जा करनारी वाहने प्रकाशझोतात चालताना दिसत होती; तर कमी दृश्यमानता व हवेतील गारव्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांनी शाळेत जाने टाळले. कालचा पूर्ण दिवस राहुन राहुन पडनाऱ्या पावसातच गेला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आनखी दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें