मोहम्मद शमी कार अपघातात जखमी, ट्रकने कारला धडक दिल्याने झाला अपघात.
भारताच्या सध्याच्या आघाडीच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला आणि पत्नी हसीन जहाँनने केलेल्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मोहम्मद शमीच्या कारला रविवारी पहाटे अपघात झाला असून, देहराडूनहून दिल्लीकडे येत असताना ट्रकने धडक दिल्याने झालेल्या या अपघातात तो किरकोळ जखमी झाला आहे. अपघातात शमीच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
पत्नीबरोबर झालेल्या मतभेदांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला मोहम्मद शमी क्रिकेट अकादमीच्या कामासाठी देहराडून मध्ये होता. तेथून आज पहाटे तो दिल्लीला परतत होता. दिल्लीला येत असताना रस्त्यात एका भरधाव ट्रकने शमीच्या कारला धडक दिली. या अपघातात शमीच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याला दहा टाके घालण्यात आले आहेत. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून, संध्याकाळी तो दिल्लीला परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें