प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी पत्रकारावरील गुन्हा तात्काळ मागे घ्या - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 20 मार्च 2018

प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी पत्रकारावरील गुन्हा तात्काळ मागे घ्या

प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी पत्रकारावरील  गुन्हा तात्काळ मागे घ्या


 सेलू तालुका पत्रकार संघाच्यावतीने सहाय्यक जिल्हाधिकार्यांकडे मागणी  

 
 सेलू (प्रतिनिधी )
समशेर खान
दहावीच्या  प्रश्नपत्रिका फुटी संदर्भात परभणी येथील दोन वृतपत्राच्या  जिल्हाप्रतिनिधींच्या विरोधात शिक्षण विभागाच्यावतीने खोटा गुन्हा नोंद करून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे .याचा सेलु तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून दाखल झालेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी जिल्हा दंडाधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे
                 सेलू तालुका पत्रकार संघाच्यावतीने मंगळवार २०मार्च रोजी सकाळी ११:३०वा. सहाय्यक जिल्हाधिकारी  राहूल कर्डीले यांची भेट घेऊन सदरील प्रकरणासंदर्भात निषेध व्यक्त करून  पत्रकारावरील गुन्हे मागे घेण्यासाठी निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की १४  मार्च २०१८ रोजी इयत्ता दहावी विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका सोशल माध्यमातून व्हायरल झाल्याप्रकरणी
तसेच सदरील प्रश्नपत्रिका परीक्षेच्या पूर्वीच अनेकांच्या मोबाईलवर आढळून आली म्हणून दै.लोकमत व दै.पुण्यनगरी या दोन वृत्तपत्रांत पेपर फुटी संदर्भात सविस्तर वृत १५मार्च रोजी छापण्यात होते .विशेष बाब म्हणजे या वृत्तपत्रात माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची प्रतिक्रिया देखील छापून आली होती असे असताना कुठल्याही घटनेची शहानिशा करण्यापूर्वीच घटनेतील संबंधित दोषींना जबाबदार न  धरता वृतपत्रात बातमी छापली म्हणुन शिक्षण विभागाने  दैनिक लोकमतचे जिल्हाप्रतिनिधी व  दैनिक पुण्यनगरी चे जिल्हाप्रतिनिधी यांच्याविरोधात परभणी येथे नवा मोंढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा खोटा व गैरजबाबदार पणे दाखल केल्यामुळे सदरील गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे .
              तसेच  प्रकरणातील संबंधित जे दोषी असतील त्यांना व शिक्षण विभागातील दोषींना जबाबदार धरून त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे . असे झाले नाही तर पत्रकार संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे .
           यासाठी मोहन बोराडे , राजेश ढगे ,विलास शिंदे ,महंमद ईलीयास , अशोक अंभोरे, श्रीपाद कुलकर्णी ,राम सोनवणे ,कांचन कोरडे ,रेवणआप्पा साळेगावकर, पंकज सोनी, समशेर पठाण, राहूल खपले ,मोहसीन अहेमद, शिवाजी आकात ,डॉ संजय लोंढे निसार पठाण ,लक्ष्मण बागल , रवी भदर्गे ,दिलीप मोरे, शंभू काकडे आदींनी पुढाकार घेतला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें