जिल्हा परिषद वालसा(डा)शाळेचे यश. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 26 मार्च 2018

जिल्हा परिषद वालसा(डा)शाळेचे यश.

जिल्हा परिषद वालसा(डा)शाळेचे यश.

शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी.
दि.26.भोकरदन तालुक्यातील वालसा-डा.शाळेने जिल्हास्तरीय सहा ते चौदा वर्ष वयोगट मुलांच्या खो-खो स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून भोकरदन तालुक्याची मान उंचावली आहे. शिक्षणाधिकारी पी.एल.कवाणे साहेब,शिक्षणसभापती तौर साहेब,उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी आदींच्या हस्ते विद्यार्थ्यानां ट्रॉफी,मेडल या शाळेत पहीली ते आठवीचे वर्ग असून  एकशेऐंशी विद्यार्थी संख्या व चारच शिक्षक आहेत.
गुणवत्तेच्या स्तरनिश्चिती मध्ये ही शाळा अव्वल असून आता जिल्हास्तरीय क्रिडास्पर्धेतही खो-खोमध्ये ही मुले सर्वप्रथम आली.या अगोदर या शाळेचे विद्यार्थी प्रश्नमंजूषा व क्रिडा स्पर्धेसाठी तीन वेळा जिल्हा स्तरावर पोहचले होते.
यानां शाळेचे प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री.बी.जी.कढवने यांचे मार्गदर्शन लाभले.
मुलांची जिद्द व चिकाटी पाहून अधिकारी, कर्मचारी,शिक्षक वृंदानी खुप कौतुक केले.
यशस्वी विद्यार्थ्यानां मुख्याद्यापक बी.एम.रायते,बी.जी.कढवने,श्रीम.केचाळे,श्रीम.कावरे,श्रीम इंगळे,श्री.वनारसे शालेय व्यवस्थापन समीती अध्यक्ष तथा सरपंच समाधान पा.वाघ आदींचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी मान.श्री दिलीप शहागडकर,विस्तार अधिकारी मान.श्री उमेश जैन,गटसमन्वयक एस.बी.नेव्हॉर,केंद्रप्रमुख एम.एन.म्हस्के,केंद्रीय मुख्याद्यापक सुभाष भुजंग श्री.राजू मालूसरे,श्री.आर्यन इंगळे,के.डी.वाघ,डी.एल.घायाळ, श्री.प्रल्हाद काळे,श्री.प्रकाश लोखंडे आदिनी अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें