सेलु येथे शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा शैक्षणिक मेळावा संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 26 मार्च 2018

सेलु येथे शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा शैक्षणिक मेळावा संपन्न.

सेलु येथे शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा शैक्षणिक मेळावा संपन्न.

समशेर खान.
प्रतिनिधी.सेलु.
आज दि.26 मार्च 2018 रोजी सेलू तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा शैक्षणिक मेळावा संपन्न झाला .या  प्रसंगी, *मा.अशोक नाना काकडे *सभापती अर्थ व बांधकाम जि प परभणी* , *मा.राजेंद्र काका लहाने  जि प सदस्य जि परभणी,मा.विनोदजी बोराडे नगराध्यक्ष सेलूमा.मंगेश नरवाडे गटशिक्षणाधिकारी सेलू* आदी मान्यवर उपस्थित होते . प्रथम मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य प्रदर्शन स्टोलचे उदघाटन करण्यात आले . व  क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .कार्यक्रमाचे  प्रास्ताविक करताना *मा.गटशिक्षणाधिकारी नरवाडे साहेबांनी सदरील मेळावा घेण्याची गरज व या मेळाव्यातून काय साध्य होणार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले .प्रथमच होत असलेल्या smc सदस्यांचा मेळाव्यात मी मनापासून आपणा सर्वांचे स्वागत करतो असे  ते म्हणाले व कार्यक्रमाचं स्वरूप  स्पष्ट केलं*
     या प्रसंगी मा . पत्रकार मोहन बोराडे यांनी या कार्यक्रमा विषयी  आपले मत मांडले .त्यांनी याप्रसंगी व्यक्त झालेल्या मुलांचे खूप खूप कौतूक केलं .अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाची खूप आवश्यकता आहे असे म्हणाले .

*मा.राजेंद्र काका लहाने यांनी सांगितले की या मेळाव्यातून सेलूच्या शैक्षणिक  गुणवतेत आणखीन भर पडणार आहे .मी सर्व शिक्षकाकडून अपेक्षा करतो की त्यांनी येणाऱ्या काळात सेलूच्या शैक्षणिक विकासात जिल्ह्यात प्रथम स्थानी रहावं. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत असा विश्वासही त्यांनी दिला*
*ग्रामीण भागातील विद्यार्थात्यांच्या शिक्षणासाठी आपण काम करत आहात हे खूप अभिनंदनिय आहे .अनेक शिक्षक खूप धडपडताना दिसतात त्यांचा मला सार्थ अभिमान वाटतो असे ते म्हणाले*

*मा.अशोक नाना काकडे यांनी सुद्धा शहरी भागात व ग्रामीण भागात काम करताना शिक्षकांची तारांबळ व त्यांच्या मनात शिक्षणा प्रती असलेली ओढ व्यक्त केली . एकवेळा गावातील धार्मिक काम कमी करा पण शाळेला भरभरून द्या असे आवाहन त्यांनी केले*

 *याप्रसंगी पारडी शाळेतील कु .राधा शेळके , मनीषा राठोड व काजल राठोड ,नेहा राठोड  महेश राठोड ,व शिवप्रसाद पवार, राधे धामणगाव,  सचिन ठोके बोरगाव,  आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले*

याप्रसंगी जि प शाळा ना सढळ हाताने मदत करणाऱ्या तालुक्यातील अनेक दान दात्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारावरून लक्षात आले की सेलू तालुक्यातही खूप मोठया प्रमाणात लोकसहभाग जमलेला आहे . 

त्यानंतर शैक्षणिक व सामाजिक विषयावर जि प प्रा शाळा कुंडी व बोरगाव शाळेंनी पथ नाट्य  सादर करून प्रेक्षकांची मन जिंकली.व एक संदेश सर्वांना दिला .

*दुपार सत्रात प्रगत शैक्षणी महाराष्ट्र, RTE2009, व शाळा व्यवस्थापन समिती चे विध्यार्थी गुणवत्ता विकासातील भूमिका या  विषयावर परिसंवाद घेण्याचे आला . या मध्ये मा.मधुकर काष्टे केंद्रप्रमुख कुपटा, युवराज माने  शिक्षक पारडी, तानाजी भोसले, कुलकर्णी सर, सबनीस मम्,  बबन राठोड, पालक सदस्य मा.माउली राठोड पारडी , बुरकुंडे बाळासाहेब यांनी सहभाग घेतला व उत्तम असे मतं मांडली*
 *कार्यक्रमाचे सूत्र संचालन युवराज माने, व नानासाहेब पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन मा.मधुकर काष्टे यांनी मानले* 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें