वेब पोर्टलच्या पत्रकारावरील खटला स्थगित
सुप्रीम कोर्टाचा गुजरात सत्र न्यायालयास आदेश
सोनपेठ(राजेश खेडकर)गुजरातमधील वेब पोर्टलच्या पत्रकारावरील खटला स्थगित करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने गुजरातच्या सत्र न्यायालयास दिले आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात या पत्रकारावर खटला सुरु होता. याचिकाकर्त्या पत्रकाराने खटला रद्द करण्यासाठी गुजरात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. परंतु गुजरात हायकोर्टाने ती याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह ए.एम.खानविलकर आणि डी.वाय.चंद्रचुड यांच्या पीठाने ही सुनावनी केली. माध्यमांनी काहीही प्रकाशित करण्यापुर्वी सतर्कता बाळगायला हवी, असे निरिक्षण पिठाने नोंदवले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें