भोकरदन नगर पालिकेत "दंगल" चर्चा सभा व जागतिक महिला दिनानिमित्त मेळाव्यात नगरसेविका फरजानाबी शेख हे गैर हजर - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 9 मार्च 2018

भोकरदन नगर पालिकेत "दंगल" चर्चा सभा व जागतिक महिला दिनानिमित्त मेळाव्यात नगरसेविका फरजानाबी शेख हे गैर हजर

भोकरदन नगर पालिकेत "दंगल"

चर्चा सभा व जागतिक महिला दिनानिमित्त मेळाव्यात  नगरसेविका फरजानाबी शेख हे गैर हजर


विशेष प्रतिनिधि :अनिस भारती

भोकरदन : येथील नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष इरफानोद्दीन सिद्दीकी व प्रभाग क्र 2 .च्या नगरसेविकेच्या पती शेख जफर मध्ये  पाणीपुरवठ्याच्या बिलावरून गुरुवारी कार्यालयातच जोरदार हाणामारी झाली. मुख्याधिकारी यांचादलना मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त मेळावा घेण्यात आला व पाणीपुरवठ्याच्या बिलावरून चर्चा सुरु होती या वेळी नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक उपस्थित शिवाय नगरसेविका फरजानाबी शेख हे अनुपस्तिथ होते विशेष म्हणजे महिला दिन निमित्त महिला साठी हे चर्चा सभा आयोजित करण्यात आली होती या सभे  मध्ये नगरसेविका फरजानाबी शेख यांचे पति महिलांचे कार्यक्रमात हाज़िर होते आणि त्यांची पत्नी नगरसेविका फरजानाबी शेख हे अनुपस्थित होते.म्हणजे हे कार्यक्रम महिला साठी नव्हे तर पुरुषासाठी होता अशी चर्चा होत आहे.दरम्यान,उपनगराध्यक्ष इरफानउद्दीन सिध्दीकी, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, नगरसेवक राजाभाऊ देशमुख, शेख कदीर, रणवीरसिंह देशमुख, नसीमखॉ पठाण, नगरसेविकेचे पती शेख जफर यांच्यासह अन्य सदस्य पाणीपुरवठ्याबाबत चर्चा सुरू अतसना उपनगराध्यक्ष इरफानउद्दीन यांनी नगरसेविका फरजानाबी शेख यांचे पती शेख जफर यांना उद्देशून  जे नगर सेवक आहे त्यांनीच बैठकीला आले पाहिजे व उपस्थित राहिले पाहिजे आणि जे पर्यन्त नगरसेविका फरजानाबी शेख हे सभागृह मध्ये येत नहीं पाणीपुरवठा विहिरींचे बिल देऊ नये, असे सांगितले. तर नगरसेविका फरजानाबी शेख यांचे पती शेख जफर यांनी बिल द्यावे लागले, असे सांगितले. उपनगराध्यक्षांना हे खटकले. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी शेख जफर यांनी ‘नगर परिषद क्या तुम्हारे बाप की है क्या’ कुणीही या कार्यालयात येऊ शकते, असे सुनावले. यावरून उपनगराध्यक्ष व नगरसेविकेच्या पतीमध्ये चांगलीच जुंपली. प्रकरण वाढत असल्याचे पाहून उपस्थितांनी मध्यस्थी केली. विशेष म्हणजे दोन्ही पदाधिकारी एकाच पक्षाचे आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें