शिवजयंती साजरी करणाऱ्या दलित, मुस्लीम, लोहार, तेली, कोळी, माळी, न्हावी, चर्मकार, बौध्द,नवबौद्ध बांधवांवर गुन्हा दाखल करणाऱ्या डीवायएसपी बिरादार यांची विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 21 मार्च 2018

शिवजयंती साजरी करणाऱ्या दलित, मुस्लीम, लोहार, तेली, कोळी, माळी, न्हावी, चर्मकार, बौध्द,नवबौद्ध बांधवांवर गुन्हा दाखल करणाऱ्या डीवायएसपी बिरादार यांची विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार

शिवजयंती साजरी करणाऱ्या दलित, मुस्लीम,  लोहार, तेली, कोळी, माळी, न्हावी, चर्मकार, बौध्द,नवबौद्ध बांधवांवर गुन्हा दाखल करणाऱ्या डीवायएसपी बिरादार यांची विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार       
                                         

शे.कलिम.
सिल्लोड(प्रतिनिधी)
रीतसर परवानगी अर्ज देऊन शांततेत शिवजयंती साजरी करणाऱ्या दलित, मुस्लिम , लोहार, तेली, कोळी, माळी, न्हावी, चर्मकार, बौध्द, बांधवांवर  गुन्हा दाखल करणाऱ्या डीवायएसपी गणेश बिरादार, पो.नी.रायकर , पोलीस कर्मचारी अनिल ठाकूर यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी विशेष पोलीसमहानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र यांच्याकडे करण्यात आलीआहे.                         या विषयी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या निर्णयानुसार सिल्लोड शहरातील फुले शाहू आंबेडकर व डाव्या परिवर्तन वादी संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 388वी जयंती साजरी करण्यासाठी दि.15/2/2018 रोजी सिल्लोड पोलीस ठाणे यांच्याकडे आयोजन समितीच्या वतीने कार्यक्रमाचा, स्थळाचा  उल्लेख करून अर्ज दिला.शिवजयंतीच्या दिवशी आम्ही विविध जाती धर्माचे, विचारधारेचे लोक शिवजयंतीला विविधतेतून ऐकते स्वरूप देण्यासाठी विविध रंगाचे झेंडे घेऊन सर्वानी शहरात मुख्य रस्त्याने शांततेत  वाहन  रैली काढली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेली रैली छ.संभाजी महाराज चौकातून छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण अभिवादन केले असता.डीवायएसपी गणेश बिरादार, पो.नी.रायकर व कर्मचारी अनिल ठाकूर यांनी रैली अडवुन परवानगीची विचारणा केली.आम्ही वाद न करता अर्ज केला असल्याचे सांगितले.सदर रैली शांततेत नियोजित मार्गाने पुढे जावून शिक्षक भवन येथे समाज प्रबोधनाचा कार्यक्रम झाला .रैलीत कोणताही अनुचित घडला नाही.कुणाचे मन दुखावले गेले नाही .असे असतांना आमच्यावर कलम 135 नुसार गुन्हा दाखल केल्याचे दुसऱ्या दिवशी कळाले.  सदर रैली ही ऐकतेचा संदेश देणारी असल्याने जातीयवादी व प्रस्थापित मंडळीच्या डोळ्यात खूपली.व रैली निघण्याच्या अगोदर सदर पोलिस अधिकारी व  कर्मचारी यांनी रैली आयोजकांना पोलीस ठाण्यात बोलवून भारतीय जनता पार्टीशी संबंधित युवा व्यापारी संघा च्या रैलीत सहभागी होण्यास सांगितले असता आम्ही स्पष्ट नकार दिल्याने दुखावलेले पोलिस अधिकारी, व कर्मचारी यांनी अधिकाराचा गैरवापर करून  आमच्यावर खोटा  गुन्हा दाखल करून आमचे चारित्र्य हनन करून आमचे गुन्हेगारीकरण केले.त्यासोबत ऐकतेच्या व सर्वधर्म समभाव विचाराला दबण्याचे काम करुन, संविधान व लोकशाही विरोधी संघटनांना जातीयवादी , प्रस्थापित यांना मदत केली.संविधान विरोधी काम करणाऱ्या सदर पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर रीतसर कायद्याने कारवाई करावी.अन्यथा या अत्याचाराच्या विरोधात संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल.व कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस समाजकंटक प्रव्रुत्तीचे सदर पोलिस अधिकारी, कर्मचारी जबाबदार राहतील असेही निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर माजी नगराध्यक्ष बनेखा पठाण,
शेख इम्रान ( गुडूडु)
 काकासाहेब मोरे, जगदीश बेदवे, नारायण फाळके, प्रताप प्रशाद, निलेश जगताप, राजू सपकाळ ' , दादाराव देवले' , सुनील सोनवणे यांच्या सह इतर जणांच्या सह्या आहेत 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें