हिलांना सन्मानाने जगता यावे +जि.प.उपाध्यक्षा सौ.भावनाताई नखाते यांचे प्रतिपादन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 12 मार्च 2018

हिलांना सन्मानाने जगता यावे +जि.प.उपाध्यक्षा सौ.भावनाताई नखाते यांचे प्रतिपादन.

महिलांना सन्मानाने जगता यावे

+जि.प.उपाध्यक्षा सौ.भावनाताई नखाते यांचे प्रतिपादन. 


कुंडी येथील शाळेत महिला मेळावा.

समशेर खान.
*सेलू (प्रतिनीधी)*
         स्री हि जन्मजात सक्षम असते.कठिणातला कठिण सामना हि स्री च करू शकते परंतु एव्हढ्यावरच न थांबता महिलांनी स्वतः च्या पायावर उभे राहुन स्वावलंबी होण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून सक्षम बनावे आणी महिलांना सन्मानाने जगता यावे या करीता पुरूषांनीही मानसिकता बदलली पाहिजे असे प्रतिपादन जि.प.उपाध्यक्षा सौ भावना अनिलराव नखाते यांनी केले .
              सेलु तालुक्यातील कुंडी येथील जिल्हा परीषद शाळेत महिला दिनानिमित्त मातापालकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेचे बक्षिस वितरण व महिला मेळावा १० मार्च रोजी आयोजीत केला होता .यामेळाव्यात मार्गदर्शन करतांना सौ भावना नखाते बोलत होत्या.यावेळी  व्यासपीठावर रोडगे अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या मधूमाला बोराडे,  विषय तज्ञ सुनिता काळे शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्या
सुरेखा मोगल , शेख अनिस , उज्वला गोंडगे , शालन मोगरे ,मधूमाला मोगल , मुख्याध्यापीका ए.डी. गोरे यांची उपस्थिती  होती.
                 या प्रसंगी  स्पर्धेतील विजयी महिला व शाळेतील महिला कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कुंडी येथील कौसडीकर यांनी जि.प.प्रा शा.ठेंगळी पिंपळगाव येथे विज्ञान प्रयोगशाळा स्थापन करून विज्ञान प्रदर्शन घेतल्या बद्दल त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला तसेच  वर्ग पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'आविष्कार 'या कवितांचा संग्रहाचे  चे विमोचन यावेळी केले
 पुढे बोलतांना भावना नखाते म्हणाल्या की   स्त्रीयांनी अंधश्रध्देच्या मागे न जाता  आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असेही नखाते म्हणाल्या .मधुबाला बोराडे यांनीही मनोगत व्यक्त केले
    सुत्रसंचलन के.सी.अंबेकर यांनी केले तर एस.एस.सबनीस ,ए.व्हि कालवाने यांनी मान्यवरां विशैष शैलीत परुचय करून दिला.प्रास्ताविक मुख्याध्यापिका ए.डी.गोरे यांनी केले .यु.पी मिश्रा  यांनी आभार मानले . यशस्वीतेसाठी  जवादवाड ,  भाले , पांडुरंग मोगल,  गजाननराव मोगल यांनी परिश्रम घेतले .


*महिलांचा सन्मान व्हावा*

एक स्री हि सर्व जबाबदारी पेलून पती, सासू ,सासरे ,नंनद ,भाया, दिर ,भावजय ,यांच्या मनाप्रमाने वागून त्यांच्याशी चांगले नाते जपते  त्यामुळे प्रत्येक कुटुंबात महिलांना सन्मान मिळावा अशी अपेक्षा ही भावना नखाते यांनी व्यक्त केली .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें