आगामी निवडणुका काँग्रेससोबत लढवणार; पवारांची घोषणा - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 25 मार्च 2018

आगामी निवडणुका काँग्रेससोबत लढवणार; पवारांची घोषणा

आगामी निवडणुका काँग्रेससोबत लढवणार; पवारांची घोषणा



पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये समान विचारधारा असलेल्या पक्षांसोबत युती करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यानुसार २०१९च्या निवडणुका काँग्रेससोबत लढवणार असल्याची घोषणा पवार यांनी केली. फर्स्टपोस्टने याबाबत वृत्त दिले आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामिल असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मागची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. याचा त्यांना चांगलाच फटका बसला होता. त्यांना सत्ता गमवावी लागली होती. दरम्यान, भाजप-शिवसेनेने निवडणुकीनंतर एकत्र येत सत्ता स्थापन केली होती.

मोदींच्या धोरणांवर टीका करताना पवार म्हणाले, नोटाबंदीने काळा पैसा येईल, अतिरेकी कारवाया थांबतील असे मोदी म्हणाले होते. तसेच आपला १ माणूस मारला तर आम्ही १० मारू असंही म्हणाले होते. मोसूलमध्ये ३९ भारतीय मारले गेले त्याला वर्ष झालं मात्र सरकारला कळलं नाही. इंदिराजींनी १९७१ मध्ये लष्करी कारवाई करून पाकिस्तानला नमवत बांगलादेशची स्थापना केली, ती खरी हिंमत.

शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त पालघरच्या दौऱ्यावर असताना पवार म्हणाले, आम्ही पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका समान विचारांच्या पक्षांसोबत मिळून लढवणार आहोत. दरम्यान, राहुल गांधी यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत युती झाली तर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावर चर्चा झाली नाही. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बुलेट ट्रेनच्या संकल्पनेच्या गरजेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें