आश्वी - ग्रामपंचायत आश्वी बुद्रूकच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमिपूजन, आश्वासनांच्या वचनपूर्तीला दमदार सुरवात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 26 मार्च 2018

आश्वी - ग्रामपंचायत आश्वी बुद्रूकच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमिपूजन, आश्वासनांच्या वचनपूर्तीला दमदार सुरवात.

आश्वी - ग्रामपंचायत आश्वी बुद्रूकच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमिपूजन, आश्वासनांच्या वचनपूर्तीला दमदार सुरवात.


प्रतिनिधी.
आमदार बाळासाहेब थोरात , आमदार डॉ. सुधीर तांबे, जेष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली
 आश्वी बुद्रूक ग्रामपंचायतीच्या यंग ब्रिगेडने निवडणुक काळात दिलेल्या वचननाम्याच्या पूर्तीला सुरुवात केली असून, आज रामनवमीच्या मुहूर्तावर भूमिपूजन व उद्घाटन समारंभाचे आयोजन केले होते.

गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत सत्तेची सुत्रे हाती घेतल्यानंतर कामांना सुरुवात झाली होती. त्यातील पूर्णात्वास गेलेल्या कामांपैकी आश्वी बुद्रूक गावठाणातील २०१६ - १७ च्या १४ व्या वित्त आयोगातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणातील प्रशांत गांधी यांचे घर ते समाजमंदिर या  रस्त्याचे काम, दलित स्मशान भुमिच्या आर. सी. सी. संरक्षक भिंतीचे बांधकाम व रंगकाम तसेच बाजारतळावरील नवीन जलशुध्दीकरण प्रकल्पाचे उद्घाटन आज करण्यात आले. तसेच विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून, गायरान वस्तीतील सुमारे २ लाख रुपये खर्चाच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या डोंगरी विकास निधीतून घेण्यात आलेल्या आश्वी बुद्रूक ते मांची रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील ४५० मीटर्सच्या डांबरीकरणाच्या कामाचे भुमिपूजन करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत १९ लाभार्थींना गॅसचे व ग्रामपंचायत ३ टक्के अपंग निधीतील ३३ धनादेशांचे वाटप करण्यात आले.

या वेळी जेष्ठ नेते अॅड. शाळीग्राम होडगर, बाळासाहेब गायकवाड, सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड, भाऊसाहेब मदने,विठ्ठल पा गायकवाड, नामदेव मदने, सिताराम होडगर,संतोष म्हसे, योगेश पिलगर, भाऊसाहेब ताजणे, राजेंद्र गायखे,रामनाथ मदने,बाळासाहेब जराड, रामकृष्ण उंबरकर,रमेश धर्माधिकारी, बबनराव खेमनर, शिवाजी गायकवाड,तान्हाजी गायकवाड मच्छींद्र होडगर ,अण्णा खेमनर ,अशोक गायकवाड,आदींसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी प्रविण इल्हे, कर्मचारी वृंद उपस्थित होते.
Tezznews 24 web news channel.
Contact.no.8888375846 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें