सिल्लोड येथे श्रीमद भागवत कथेचे आयोजन.
आजय बोराडे.
सिल्लोड [[]] येथील शिवशारदा ग्रामविकास मंडळाचे सचिव कुष्णा लहाने याच्या मातापित्याच्या स्मरणार्थ व मुलाच्या वाढदिवसा निमित्त 13 मार्च ते 20 मार्च दरम्यान सिल्लोड शहरातील 36 एक्कर परीसरात भव्य श्रीमद भागवत संगितमयकथा व हरीनाम किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन मंगळवार रोजी सकाळी ग्रंथ पालखी मिरवणुकीने या महोत्सवाची सुरूवात करण्यात आली ही पालखी या पालखीतील लहान वारकरी मुख्य आर्कषन ठरले होते तर महीला अभंग गाऊन फुगड्या खेळ्याल्या ही शिक्ष क काँलनीतील मुख्यमार्गावरूनही पालखी कार्यक्रमस्थळी पोहचली. त्या नंतर विधीवत पुजाअर्चा करून संगितमय भागवत कथेस सुरूवात करण्यात आली. भागवत संगीत कथेत पाप पुण्य , द्न्यान अद्ण्यआन , वैराग्य भक्ति या विषयावर सखोल प्रवचन केले . यावेळी आ. अब्दुल सत्तार, माजी प्राचार्य एन बी चापे, नंदकिशोर सहारे, कुष्णा लहाने, अँड शेळके,निव्रत तहसिलदार वाल्मिक काटकर , शंकर खान्ड्वे , विठल सपकाळ आदीची प्रमुख उपस्थीती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हभप कमलाकर महाराज पिंगाळकर, ह भ प रामेश्वर महाराज पंवार , सौ.संध्या लहाने, पुंडलिकराव बावस्कर, विठ्ठल लहाने, गणपत चाबुकस्वार, सुभाष लहाने, दादासाहेब चाबुकस्वार, शिवाजी लहाने, संतोष चाबुकस्वार,पंकज पाटिल , दादाराव खिल्लारे , आदीसह निवासी मतीमंद मुकबधीर अपंग विद्यालयाचे कर्मचारी परीश्रम घेत आहेत .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें