ज्ञानदानाचे समाधान सर्वात मोठे - प्राचार्य डॉ. सातपुते - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 10 मार्च 2018

ज्ञानदानाचे समाधान सर्वात मोठे - प्राचार्य डॉ. सातपुते

ज्ञानदानाचे समाधान सर्वात मोठे - प्राचार्य डॉ. सातपुते

सोनपेठ(राजेश खेडकर)
येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास ग्रंथभेट देण्याची परंपरा असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनीही त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने ग्रंथालयास ग्रंथभेट दिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम होते तर प्रमुख पाहूणे ग्रंथवाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर हे होते. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. सातपुते यांनी ज्ञानदानाचे समाधान सर्वात मोठे असल्याचे सांगत; सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळ वेळोवेळी शाळा, महाविद्यालयांना लोकसहभागातून पुस्तकांचा पुरवठा करुन अतिशय प्रेरणादायी कार्य करीत असल्याचे मत व्यक्त केले.
कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास ग्रंथभेट देण्याची परंपरा असून यात सर्वच घटक हिरीरिने भाग घेतात, त्यात आज प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास २८७५/- रूपयांची पुस्तके भेट देऊन ही परंपरा कायम राखली. यावेळी त्यांनी सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीसही रोख १०००/- रुपयांची मदत दिली.
यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें