सोनपेठ मधील दोन शिक्षकांना निरोप
+दोघांचीही उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदी पदोन्नतीवर बदली
सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२८मार्च २०१८
आज शहरातील जि.प.प्रा.शाळेतील सहशिक्षक माणिक नागरगोजे यांची उच्चश्रेणी मुख्याध्यापकपदी जि.प.कें.प्रा.शा. राणीसावरगाव ता.गंगाखेड जि.परभणी येथे पदोन्नती झाल्यामुळे तर केंद्रिय कन्या शाळेतील सहशिक्षक ओमप्रकाश स्वामी यांची उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणुन जि.प.प्रा.शाळा मुद्गल (केंद्र लिंबा) ता.पाथरी जि.परभणी येथे पदोन्नतीवर बदली झाल्यामुळे दोघांना स्वतंत्ररित्या निरोप देण्यात आला. जि.प.प्रा.शा.सोनपेठ येथील माणिक नागरगोजे यांच्या निरोप प्रसंगी केंद्र प्रमुख कोटलवार, मुख्याध्यापक के.बी. रत्नपारखे यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते तर केंद्रिय कन्या शाळेतील सहशिक्षक ओमप्रकाश स्वामी यांना पदोन्नती झाल्याने झालेल्या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शेषराव राठोड हे होते तर सहशिक्षक मदन साठे, समाधान सुर्यवंशी, श्रीमती ज्ञानेश्वरी गोरे, श्रीमती मेनका क्षिरसागर, श्रीमती नयना बारगजे, श्रीमती प्रणीता कुलकर्णी, श्रीमती सविता भराडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यार्थिनी कु. पूजा गावडे व कु. पूजा झाड यांनी केले व अभार प्रदर्शन सहशिक्षक प्रमोद गादेकर यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें