आदर्श इंग्लिश शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 8 मार्च 2018

आदर्श इंग्लिश शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

आदर्श इंग्लिश शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी: दि.8 मार्च 2018 रोजी भोकरदन येथील आदर्श इंग्लिश शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. सौ. सुनिता सावंत,प्रमुख पाहुण्या अरुणा औटी,पुर्भे ताई यांच्या हस्ते सावित्री बाई फुले व माता जिजाऊच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यालयाच्या वतीने  डॉ. सुनिता सावंत ,औटी ताई,पुर्भेताई यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.व माता जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई,इंदिरा गांधी,लतामंगेशकर यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मनोगत वयक्त केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सुनिता सावांत ह्यांनी 'मुलगी टिकली पाहिजे,मुलगी शिकली पाहिजे' प्रसंगी स्रियांनी कणखर बनून राष्ट्रनिर्माण कार्यात मोठ्या प्रमाणात हातभार लावला पाहिजे असे सांगितले.कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थी,कर्मचारी आदि उपस्थित होते.आभार प्रदर्शन नंतर विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें