"भले कम ही खाया करो पर बच्चों को पढाया करो" - इमरान प्रतापगढी - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 18 मार्च 2018

"भले कम ही खाया करो पर बच्चों को पढाया करो" - इमरान प्रतापगढी

"भले कम ही खाया करो पर बच्चों को  पढाया करो" - इमरान प्रतापगढी


*सेलूच्या राष्ट्रीय एकात्मता मुशायऱ्यात अफाट जनसागराची हजेरी

 समशेर खान.
शिक्षणाने अभियंता, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, संशोधक, वैमानिक, विचारवंत, न्यायाधिश घडले जातात. आणि हे घडलेले उच्च विद्याविभूषित देशाच्या प्रगतीला हातभार लावतात परिणामी देश सर्वच क्षेत्रात समतुल्य विकास साधतो म्हणून *"दो निवाले भले कम ही खाया करो, अपने बच्चों को लेकिन पढाया करो"* असा मौलिक विचार आंतरराष्ट्रीय शायर इमरान प्रतापगढी यांनी शायरीच्या माध्यमातून सेलू येथील राष्ट्रीय एकात्मता मुशायऱ्यात मांडले.            

                    शहरातील आठवडी बाजारात आ. विजय भांबळे मित्रमंडळाच्या वतीने शनिवार 17 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रीय एकात्मता कुलहिंद मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आ.विजय भांबळे, आ बाबजानी दुरानी, डॉ. संजय रोडगे, विनायक पावडे, अशोक काकडे जिप सभापती बांधकाम व अर्थ, जिप सदस्य राजेंद्र काका लहाने,  दत्तराव मोगल ,पुरुषोत्तम पावडे पं. स.सभापती, गोरख भालेराव ,अँड.बालासाहेब रोडगे. आनंद डोईफोडे, अजीम कादरी ,सुधाकर रोकडे, भारत इंद्रोके, पप्पू शिंदे ,गौतम साळवे, माऊली ताठे मुस्ताक अहमद रज्जाक, परवेज सौदागर ,अजय डासाळकर, गोस लाला ,ब्रह्मानंद मोगल, विशाल देशमुख ,पंकज चव्हाण ,शेख साहेब, शिवराम कदम...जिंतूर राकॉ तालुकाध्यक्ष मनोज थिटे, शहराध्यक्ष शौकत लाला, नगरसेवक कपिल फारुकी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, गट नेते मनोहर डोईफोडे, नगरसेवक श्यामसुंदर मते, रामराव उबाळे, अहेमद बागवान, इस्माइल पहेलवान, प्रदीप चौधरी, दलमीर पठाण, उस्मान पठाण, शाहेद बेग मिर्झा, उस्मान पठाण, शोएब जानिमिया आदींची उपस्थिती होती. यावेळी मुशायऱ्याचे मुख्य आकर्षण तथा तरुणाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आंतरराष्ट्रीय शायर इमरान प्रतापगढी यांनी आपल्या नुतन शायरीच्या माध्यमातून समाजातील वास्तविकता अधोरेखित करण्यासाठी भारतामधील गंगा जमुना संस्कृतीवर प्रकाश टाकत भारतामधील हिंदू - मुस्लिम मधील भाईचारा व्यक्त करण्यासाठी *"चाक है जिगर फिर भी आये है वजु कर के,जायेंगे हकीकत से तुमको रुबरु कर के,प्यार की बडी इससे और मिसाल क्या होगी, हम नमाज पढते है गंगा मे वजु कर के"* या शेरच्या माध्यमातून हिंदू-मुस्लीम मधील प्रेमाची अभिव्यक्ती करून विद्यमान सरकारच्या फसव्या भूलथापांवर शायरीच्या शैलीतून उपहास केला तर राष्ट्रीय पातळीवर प्रख्यात उर्दु शायर संपत सरल, शकील जमाली, लता हया, डाॅ नुसरत महेंदी, अबरार कशीफ, काझी सुफयान, नईम फराज, मुश्ताख अहेमद आदींनी स्त्री शिक्षण, स्त्री पुरुष समानता, जातीय सलोखा, राष्ट्रीय प्रेम, राष्ट्रभक्ती, निसर्ग प्रेम, आई-वडिलांचे महत्व, सामाजिक जबाबदाऱ्या, संस्कृतीचे जतन अशा महत्वपूर्ण विषयावर वैविध्यपूर्ण शायरीची उधळण करून रसिक श्रोत्यांची दाद मिळवली. सदरील मुशायऱ्यासाठी संबंध मराठवाड्यातील अफाट जनसागराने सलग सहा तास मुशायऱ्याचा  मनमुराद आनंद लुटला

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें