भागवत पोपडे यांना समाज भुषण पुरस्कार जाहिर - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 22 मार्च 2018

भागवत पोपडे यांना समाज भुषण पुरस्कार जाहिर

भागवत पोपडे यांना समाज भुषण पुरस्कार जाहिर

सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२२मार्च २०१८
लातुर येथे होणाऱ्या आठव्या  राज्यस्तरीय बसव महामेळाव्यात सोनपेठ येथील विरशैव समाजाचे नेते तथा दै.सामनाचे तालुका प्रतिनिधी भागवत पोपडे यांना बसव महामेळावा  संयोजन समिती लातुरच्या  वतीने  समाजाचे उत्कृष्ट कार्य  केल्यामुळे समाज भुषण  पुरस्काराची निवड करण्यात आली असुन  हा  पुरस्कार  दि.३०मार्च २०१८ रोजी लातुर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बसव महामेळाव्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

या बसव मेळाव्याचे मुख्य संयोजक प्रा.सुदर्शन आहेत. भागवत पोपडे यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासुनच सामाजिक कार्य करण्याची आवड होती. आई वडिलांचे संस्कार व गुरूंचे आशिर्वाद त्यांना मिळाल्यामुळे समाजातील सामाजिक उपक्रम राबावण्यासाठी अग्रेसर असतात. त्यामध्ये वाढदिवसानिमित्त गोर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक सहित्याचे वाटप करणे, तसेच मुलाच्या व मुलीच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील शाळेंना ग्रंथदान व गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक सहित्याचे वाटप करणे असे विविध उपक्रम राबवत असतात. भागवत पोपडे यांना समाजभुषण पुरस्कार मिळाल्यामुळे वीरशैव समाज, ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठ व मिञपरिवारातुन या निवडीचे स्वागत होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें