महाराष्ट्रच नव्हे; देशातील पहिली ‘पॅड वूमन’ : मेघनादिदी बोर्डीकर - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 25 फ़रवरी 2018

महाराष्ट्रच नव्हे; देशातील पहिली ‘पॅड वूमन’ : मेघनादिदी बोर्डीकर

महाराष्ट्रच नव्हे; देशातील पहिली ‘पॅड वूमन’ : मेघनादिदी बोर्डीकर 


परभणी :

महिला आणि तरूणींना त्यांच्या नाजूक दिवसांत मदतीला धावून जाणाऱ्या एका अवलीयाची कहाणी नुकतीच ‘पॅडमॅन’ या हिंदी चित्रपटातून समोर आली आहे. याच धर्तीवर काम करत परभणी जिल्हा, महाराष्ट्र राज्यच नव्हे तर देशातील पहिली ‘पॅड वूमन’ होण्याचा बहुमान युवानेत्या मेघनादिदी बोर्डीकर यांनी पटकावला आहे. त्यांनी देशातील दुसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या मोफत सॅनीटरी पॅड व्हेंडींग मशिनचे लोकार्पण कांही दिवसांपूर्वीच केले असून दुसरी व्हेंडींग मशिन आज सेलूत तरूणी आणि महिलांना अर्पण करण्यात आली.  त्यांच्या या ऊपक्रमामुळे मेघना दिदींचे नांव जिल्ह्याची ‘पॅड वूमन’ म्हणून घेतले जात आहे.

महिला आणि तरूणींच्या नाजूक काळात त्यांना मानसीक आधारासह निरोगी राहण्यासाठी सॅनीटरी पॅडस् ची आवश्यकता असते. पण या बाबीची कधीच कुठे चर्चा होत नाही. किंवा ती केली जात नाही. हिच गोष्ट अधोरेखीत करणारा अक्षयकुमार अभिनित एक हिंदी चित्रपट सध्या सुरू असून त्याची सर्वत्र चर्चा सुरूय. पण हा चित्रपट प्रदर्शीत होण्यापूर्वीच परभणीच्या युवानेत्या मेघनादिदी बोर्डीकर यांनी दिनांक 24 फेब्रुवारी वार शनिवारी .फेब्रुवारी रोजी सेलू येथील बस स्थानकावर मोफत सॅनीटरी पॅड व्हेंडींग मशिनचे महिलार्पण केले. कुठलाही गाजावाजा न करता विद्यार्थीनींच्या हस्ते या मशिनचे ऊद्घाटन करण्यात आले. ही मशिन सेलू बस स्थानकावर व्यवस्थित पणे सुरू असून अनेक महिला आणि नव तरूणी याचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे.

आज दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सेलू बस स्थानकावर जिल्ह्यातील दुसऱ्या व्हेंडींग मशिनचे ऊद्घाटन करण्यात आले. मेघनादिदी बोर्डीकर यांचेसह डॉ हर्षा माकोडे, सौ. शिंदे, सौ. साडेगावकर, लड्डा मॅडम, साळुंके मॅडम यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थीनींची यावेळी ऊपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांतील बस स्थानकांवर लवकरच अशा मशीन्स बसविण्याचे काम पुर्ण केले जाणार असल्याची माहिती यावेळी मेघनादिदी बोर्डीकर यांनी दिली आहे.

ऐनवेळी अडचण होणाऱ्या आणि सॅनीटरी पॅड विकत न घेवू शकणाऱ्या महिला आणि खासकरून विद्यार्थीनींसाठी ही अतीषय मोलाची मदत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त होत होत्या. सौ. मेघनादिदी राबवत असलेल्या या ऊपक्रमामुळे त्या महिला आणि नवतरूणींसाठी खऱ्या अर्थाने ‘दिदी’ ठरत असल्याची भावना यावेळी ऊपस्थित असणाऱ्या विद्यार्थीनी व्यक्त करत होत्या. दुसरीकडे, ऊपस्थित महिलांमध्ये मेघनादिदी बोर्डीकर या प्रत्यक्षात  ‘पॅड वूमन’ होत महिला आणि विद्यार्थींनींच्या नाजूक दिवसांमध्ये मदतीचा हात देत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या...!!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें