औरंगाबाद-जळगाव महामार्गावर अपघात;एकजण जागीच ठार - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 11 फ़रवरी 2018

औरंगाबाद-जळगाव महामार्गावर अपघात;एकजण जागीच ठार

औरंगाबाद-जळगाव महामार्गावर अपघात;एकजण जागीच ठार 


(प्रतिनिधी अजय बोराडे ) औरंगाबाद-जळगाव महामार्गावर दि.१०(शनिवार)रोजी मोटारसायकल व खाजगी  बसचा अपघात झाल्याने लिहाखेडी ता.सिल्लोड येथिल तरुण गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाला. लिहाखेडी येथिल श्रीराम विठ्ठल फरकाडे(२५) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
काल रात्री नऊच्या  वाजेचे सुमारास  पालोद येथिल साई हॉटेल च्या जवळ मोटारसायकल एम.एच.२०,सी.क्यु.३६१८ वरुन सिल्लोडकडुन लिहाखेडीकडे चालला होता, श्रीराम विठ्ठल फरकाडे वय २४अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाल्याने तो जागीच मरण  पावला. घटनेची माहिती मिळतास  घटनास्थळी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सा.पो.उपनिरिक्षक बिसे, पो.नाईक नायसे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालयाचे पोलीस कर्मचारी शांताराम सपकाळ, विष्णू ढाकणे ,यांनी तात्काळ घटनास्थळी धावघेवुन जिम्मा सिल्लोड येथिल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यास मदत केली व वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेची सिल्लोड येथिल   ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अकस्मित मृत्युची नोंद करण्यात आ ली आहे.याघटनेचा पुढील तपास सिल्लोड ग्रामीणचे ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल काळे हे करीत आहेत.

        

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें