सशक्त आरोग्यासाठी जंतनाशक गोळीची आवश्यकता - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 11 फ़रवरी 2018

सशक्त आरोग्यासाठी जंतनाशक गोळीची आवश्यकता

सशक्त आरोग्यासाठी जंतनाशक गोळीची आवश्यकता

सौ.भावनाताई नखाते यांचे प्रतिपादन

जि.प.प्रा.शा.हादगाव बु येथे जंतनाशक दिन साजरा



 पाथरी (वार्ताहर )
                    लहान  बालके व मुलांमध्ये रक्ताशय , अशक्तपणा व कुपोषणासारखे गंभीर आजार उद्भवतात  यावर मात करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाने विविध उपायोजना राबविल्या असुन त्याचाच एक भाग म्हणून जंतनाशक गोळी वाटप हि  मोहीम राबवली जात आहे सशक्त आरोग्यासाठी जंतनाशक गोळी चे सेवन करणे आवश्यक असल्याचे  मत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ भावनाताई  नखाते यांनी व्यक्त केले.
           जिल्हा परिषद शाळा  हादगाव (बु)  येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय जंत नाशक दिनाचे  उदघाटन जि.प.आरोग्य सभापती सौ.भावनाताई अनिलराव नखाते यांचे हस्ते करण्यात आले .
                   याप्रसंगी सहाय्यक जिल्हा आरोगय अधिकारी  डाॅ.एस.पी.देशमुख, तालूका आरोग्य अधिकारी  डाॅ.बी.आर.टेंगसे ,गट शिक्षणाधिकारी विश्वास खोगरे ,केंद्रप्रमुख  रोहिदास टेंगसे ,सरपंच  श्रीकीशन नखाते ,शाळा समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर नखाते ,मुख्याध्यापक चंद्रमोरे ,लाखाडे यांची उपस्थीती होती.
                     परभणी जिल्ह्यात १०ते १५फेब्रुवारी दरम्यान आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या  सर्व शाळा ,अंगणवाडी मधिल मुलांना जंतनाशक गोळी वाटप मोहिमेचा शुभारंभ सौ.भावनाताई नखाते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना सौ.भावनाताई नखाते म्हणाल्या  जंतामुळे मुलांची वाढ  खुंटते व बौद्धिक विकास थांबतो त्यामुळे वर्षभरातून दोन वेळेस जंतनाशक गोळी बालकांना देणे गरजेचे आहे. पोषण स्थिती व शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जंतनाशक गोळी आवश्यक असल्याचे मत यांनी व्यक्त केले. पालकांनी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना या जंतनाशक गोळीचे सेवन करण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन सौ नखाते यांनी केले .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें