किरन स्वामी यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकिय प्रतिनिधी म्हणुन निवड - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 22 फ़रवरी 2018

किरन स्वामी यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकिय प्रतिनिधी म्हणुन निवड

किरन स्वामी यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकिय प्रतिनिधी म्हणुन निवड

सोनपेठ(राजेश खेडकर)
येथील साप्ताहिक सोनपेठ दर्शनचे संपादक श्री.किरन स्वामी यांची महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकिय प्रतिनिधी सदस्य पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. याबाबतचे निवड पत्र निवासी उपजील्हाधिकारी मा.अंकुश पीनाटे यांनी आज त्यांना दिले आहे.
जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या या समितीचे पदसिध्द सचिव म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी काम पाहतात. पोलिस अधिक्षक, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त, दुर संचार विभागाचे कार्यकारी अभियंता, वैध मापन शास्त्र विभागाचे सहाय्यक निबंधक, जिल्हा कृषी अधिक्षक, जि.प.चे आरोग्य अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी हे या समितीचे पदसिध्द सदस्य आहेत. या समितीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अशासकीय सदस्य म्हणून किरन स्वामी यांची निवड करण्यात आली आहे.
 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ही निवड घोषित केली आहे. या समितीवर कार्य करणार्‍या सदस्यांनी शासनाचे निर्णय व शासनाकडून वेळोवेळी केल्या जाणार्‍या सुचनानुसार काम पाहणे अपेक्षित आहे. जिल्हयातील ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करतानाच जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या कार्यालयात दर महिन्यास होणार्‍या बैठकांनाही या सदस्यांना उपस्थित रहावे लागते.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड झाल्याबद्दल विविध मित्रमंडळ, संघटना, पत्रकार संघ व हितचिंतकांकडुन किरन स्वामी यांचे सोनपेठ शहरवासीयांकडून अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें