मोठी बातमी - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 6 फ़रवरी 2018

मोठी बातमी

*माँ तुझे सलाम… शहिदाची आई म्हणते, दुसऱ्याही मुलाला फौजीच केलं असतं!*

*पाकिस्तानकडून हिंदुस्थानच्या राजौरी सीमेवर करण्यात आलेल्या गोळीबारात शहीद झालेले कॅप्टन कपिल कुंडू यांच्या आईच्या शब्दानं हा देशवीर-वीरांगणांना जन्म देणाऱ्या वीर मातांचा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. देशाच्या रक्षणासाठी आपला मुलगा शहीद झाल्यानंतरही ‘आपल्याला आणखी एक मुलगा असता तर त्याला देखील फौजीच बनवलं असतं’, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.हिंदी वृत्तवाहिनी ‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत शहीद कॅप्टन कपिल कुंड यांची आई सुनीता कुंडू यांनी सांगितलं की, आम्ही त्याला आयआयटी मध्ये पाठवणार होतो. पण त्याने एनडीएची तयारी केली. त्याची निवडही झाली, मग आम्ही त्याला रोखले नाही. आज आपल्या गावातील प्रत्येक मुलगा कॅप्टन कपिल सारखं व्हायचं आहे, असं म्हणतो. ही अभिमानास्पद बाब असल्याचं त्या म्हणाल्या. तो नेहमी कुटुंबाची काळजी घ्यायचा. मला दु:ख होऊ नये म्हणून सैन्यातील अनेक गोष्टी मला सांगत नव्हता. फक्त बहिणींसोबत त्या गोष्टी शेअर करायचा. आम्हाला आमच्या मुलावर गर्व आहे. पण त्याला देवानं आणखी मोठं आयुष्य दिलं असतं तर अधिक आनंद झाला असता, असंही त्या म्हणाल्या.*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें