अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे मंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 12 फ़रवरी 2018

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे मंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे मंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन


सोनपेठ(राजेश खेडकर)

येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभाग्रहात मा.ना.बबनराव लोणीकर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री समाधान शिबीर आढावा बैठकीस आलेले असता त्यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने तालुका अध्यक्ष किरण स्वामी यांनी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले त्यात प्रमुख मागण्या परभणी जिल्ह्यातील जात पडताळणी अधिकारी व उप विभागीय अधिकारी चिरीमिरी साठी सेवा हमी कायद्याचे उल्लंघन करतात त्यांची विभागीयस्तरावर चौकशी करून कार्वाहीची मागणी, महावितरण अधिकारी आणि ठेकेदार यांच्या कामाची चौकशी, शासनाच्या विहिरी, शेततळे, शौचालय आणि घरकुल ग्रामीण आणि शहरी या ठिकाणी वितरीत झालेले पर जिल्ह्यातील समिती मार्फत चौकशी करून दोषीवर कारवाही ची मागणी, प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी साठा मुबलक तसेच वाढवून देण्याचे संबंधितांना आदेशित करणे, सोनपेठ येथून परभणी, औरंगाबाद, मुंबई, पंढरपूर, शिर्डी एस.टी. महामंडळाची बस निरंतर अखंडित तत्काळ चालू करणे, शहरातील नागरिकांना स्वच्छ फिल्टरचे पाणी पुरवठा करणे, शहरातील अव्वाच्या सव्वा पाणी पट्टी तत्काळ कमी करणे, सर्व कार्यालयीन प्रमुखांना वेळोवेळी होणाऱ्या बैठका तसेच भेट देणारे वरिष्ठ अधिकारी, मंत्री, खाजदार, आमदार आदींचे दौरे व बैठकीचा इतिवृतांत नागरिकांना माहिती होण्यासाठी प्रेस नोट तयार करण्यासाठी तसेच सर्व दैनिक आणि साप्ताहिक प्रतिनिधींना वितरीत करण्यासाठी यंत्रणा उभारावी, तालुक्यातील वेळोवेळी बंद पडणारे हातपंप आणि बंद असलेले हातपंप तत्काळ दुरुस्ती साठी आदेशित करणे आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तालूका अध्यक्ष किरण स्वामी, सदस्य सर्वश्री  राधेशाम वर्मा, बळीराम काटे, मंजूर मुल्ला, अभिजित गाडेकर, विजय काळे, पांडुरंग शिंदे, हरिभाऊ डाके, तुकाराम यादव, धोडीराम शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें